पुणे

भारती विद्यापीठाच्या ‘लाजाळू’ एकांकिकेची बाजी

CD

पुणे, ता. ६ : महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस् यांनी सादर केलेल्या ‘लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी देण्यात येणारा ‘जयराम हर्डीकर करंडक’ यंदा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘एरर : ह्युमन डिटेक्टेड’ या एकांकिकेने पटकाविला.
स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक असलेला ‘हरी विनायक करंडक’ यंदा अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या ‘आठवडे बाजार’ या एकांकिकेला, तर सांघिक तृतीय क्रमांकाचा ‘संजीव करंडक’ मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘स्कीम’ या एकांकिकेला जाहीर झाला.
स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) भरतनाट्य मंदिरात आयोजित केली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघांचे तीन सत्रांत सादरीकरण झाले. रविवारी रात्री स्पर्धा संपल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. हृषीकेश जोशी, रेणुका दफ्तरदार आणि निपुण धर्माधिकारी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : आदित्य माने (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : नीरज जोशी (डीइएस पुणे विद्यापीठ)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : स्वानंदी भारताल (भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : संस्कार फडके (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
उत्तेजनार्थ दिग्दर्शन : (अंतिम फेरी) : आर्या दीक्षित, अदिती कुलकर्णी (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : स्वानंदी भारताल (भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌)
अभिनय नैपुण्य (अभिनेता) : शिवकुमार घोडेस्वार (भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌)
अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : सुप्रिया यादव (राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
वाचिक अभिनय नैपुण्य : पार्थ ढोरे (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)

अभिनय उत्तेजनार्थ (अंतिम फेरी)
केतकी भालवणकर, विराज दिघे (मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड)
आदित्य माने (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
मुक्ता बापट, शाश्वती वझे, मैत्रेयी दीक्षित (सर परशुरामभाऊ महाविद्यालय)
ओंकार कापसे (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
आर्या थोरात (राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
तनिष्का देशमुख, दिशा उपाध्ये (मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट आयोजित संघ (भगीरथ करंडक) : डीइएस पुणे विद्यापीठ

47793

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT