पुणे

पुसेगावात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली; ४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास

CD

पुसेगावात चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री पाच दुकाने फोडली; चार लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास

पुसेगाव, ता. ६ : पुसेगाव- फलटण रोडवरील परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच दुकाने फोडून सुमारे चार लाख ६३ हजार ८५२ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी (ता. ५) रात्री दहा वाजल्यापासून रविवारी (ता. ६) सकाळी साडेआठपर्यंतच्या काळात चोरट्यांनी पुसेगाव-फलटण मार्गावरील दुकाने लक्ष्य केली. या सलग घरफोड्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल हारूण शिकलगार यांच्या एएम ऑटो अ‍ॅक्सेसरीज ॲण्ड बॉडी पार्टस्, आकाश भरत जाधव यांच्या सिद्धेश्वर व्हील्स ॲण्ड टायर्स, महेश गोपीचंद शिंदे यांच्या बालाजी हार्डवेअर, विजय पंढरीनाथ बर्गे यांच्या स्वराज वॉच आणि संजय शामराव चव्हाण यांच्या हॉटेल साईश या पाच ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला.

एएम ऑटो अ‍ॅक्सेसरीज ॲण्ड बॉडी पार्टस् या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलईडी लाईटचे सहा नग, विविध प्रकारचे एलईडी बल्ब, ऑटो अ‍ॅक्सेसरीज, ऑटो एक्सेल व इतर साहित्य, कॅमेरे, फॉग लॅम्प, प्रोजेक्टर तसेच रोकड लंपास केली. या दुकानातून चोरीस गेलेल्या मालाची नोंद सुमारे दोन लाख ३३ हजार ७०० रुपये आहे. सिद्धेश्वर व्हील्स ॲण्ड टायर्समध्ये चोरट्यांनी योकोहामा कंपनीचे सहा टायर, ब्रीजटोन कंपनीचे चार टायर, सीएट कंपनीचे चार टायर तसेच इतर कंपन्यांचे एकूण २० टायर चोरून नेण्यात आले. याशिवाय वायफाय मशिन राउटरही लंपास करण्यात आला. येथील चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ८० हजार असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

बालाजी हार्डवेअरमध्ये चोरट्यांनी दोन ग्राइंडर आणि चार हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केली. स्वराज वॉच या दुकानातून चोरट्यांनी टायटन, सोनाटा, ॲटीक अशा विविध कंपन्यांची महागडी घड्याळे आणि रोकड असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. हॉटेल साईश मधून चोरट्यांनी दोन हजारांची रोकड लंपास केली. या घटनांमुळे पुसेगाव परिसरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT