पुणे

आमच्यावर हल्ला झाल्यास सर्व शस्त्रांनी प्रत्युत्तर

CD

आमच्यावर हल्ला झाल्यास
सर्व शस्त्रांनी प्रत्युत्तर

पुतीन यांचा युरोपीय देशांना इशारा

मॉस्को, ता. २ (पीटीआय) : रशियाचा कोणत्याही युरोपीय देशांवर हल्ला करण्याचा विचार नाही. मात्र, आमच्या भूभागावर हल्ला झाला, तर ‘सर्व शस्त्रां’निशी प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला.
रशिया आणि युरोपीय देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी परराष्ट्र धोरणविषयक कार्यक्रमात बोलताना वरील इशारा दिला आहे. पाश्चिमात्य आणि युरोपीय देश काही वर्षांमध्ये रशियाबरोबर युद्ध करण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बाल्टिक समुद्रामध्ये युद्धसराव करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. बाल्टिक समुद्रातील कलिनीनग्राडचा प्रदेश रशियापासून तोडण्याचा प्रयत्न कोणत्याही देशाने केला, तर त्याच्या संरक्षणासाठी आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यासह मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा रशियाने ‘नाटो’ देशांना दिला होता. अनेक युरोपीय देशांतील रशियन दूतावासांनी याविषयी निवेदने प्रसिद्ध केली होती. ‘रशिया अन्य देशांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असे सांगून युरोपीय नेते धोकादायक खेळ खेळत आहेत. हे सर्व आरोप चुकीचे आहेत. कोणत्याही नाटो देशाने कलिनीनग्राडला रशियापासून वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही अण्वस्त्रांसह सर्व अस्त्रांचा वापर करण्यासाठी तयार आहोत,’ असे रशियाच्या आयर्लंडमधील दूतावासाने म्हटले आहे. त्यावर विचारले असता, पुतीन म्हणाले, ‘‘ही धमकी नाही, तर आम्हाला धमकावण्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT