टिपः या बातम्यांसाठी झळा युद्धाचा असा लोगो वापरावा.
..........
KTR26B09233,
KTR26B09234
पीव्हीसी पाइप
.............
पाइपच्या ११० ते ८५० दरवाढीने
सिंचन योजनेचा खर्च वाढला
शेती उद्योग अडचणीत
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. १६ : इस्राईल, अमेरिका, इराण आदी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. पीव्हीसी पाइपसाठी लागणारा कच्चामाल परदेशातून येत असल्याने त्याचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी २० फुटांच्या विविध आकारांच्या पाइपच्या दरात साधारण ११० ते ८५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
उन्हाळ्यात उभी पिके जगविण्यासाठी शेतकरी विहीर, बोअरवेल तसेच उजनी धरणाच्या पाण्यासाठी पीव्हीसी पाइपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या या कामांना तात्पुरता ब्रेक बसला आहे. वाढत्या उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज असताना पाइपच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे, असे पाइप विक्रेते राजेंद्र दोभाडा यांनी सांगितले.
युद्धापूर्वीचे पीव्हीसी पाइपचे दर सध्याचे दर
२ इंची २९० ------- ४०० रुपये
२.५ इंची ४१५ ------ ५३५ रुपये
३ इंची ५३५ ------- ६९० रुपये
४ इंची ८२० -------- १०५० रुपये
५ इंची १२५० -------- १८०० रुपये
६ इंची १४५० -------- २३०० रुपये
तर काळ्या पाइपच्या दरातही १०० ते १५० रुपये प्रति मीटर वाढ झाली आहे.
--------------------------
युद्धजन्य परिस्थितीमुळे पाइपचे दर वाढले आहेत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरळीत झाल्यास कच्चामाल उपलब्ध होऊन वाढलेले पाइपचे दर स्थिर होतील असा अंदाज आहे.
- शांतिलाल दोभाडा, विक्रेता, केत्तूर ता.करमाळा
--------------------------
कच्च्या मालाअभावी पीव्हीसी पाइपचे उत्पादन घटले
रेझिन मिळत नसल्याने उद्योजक अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ : युद्धजन्य परिस्थितीमुळे पीव्हीसी पाइप निर्मितीसाठी लागणारे रेझिन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पाइप उत्पादनात घट झाली आहे. कच्च्या मालाच्या कमतरतेचा परिणाम उद्योगांवर होत असून उद्योजक अडचणीत सापडले आहेत.
सोलापुरात पीव्हीसी पाइप निर्मितीचे अनेक उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक असलेले रेझिन प्रामुख्याने चीनमधून आयात केले जाते. तसेच स्थानिक पातळीवर काही प्रमाणात ते रिलायन्ससारख्या उद्योगांकडून उपलब्ध होते. मात्र सध्या सर्वत्र रेझिनची टंचाई निर्माण झाल्याने त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
उन्हाळ्यात शेतीसाठी पाइपची मागणी वाढत असते. या काळात शेतकरी पाण्याच्या स्रोतापासून नव्याने पाइपलाइन टाकणे किंवा जुने पाईप बदलण्याची कामे करतात. त्यामुळे बाजारात पीव्हीसी पाइपची मागणी वाढलेली असते. मात्र, याच कालावधीत कच्चा माल उपलब्ध नसल्याने उद्योगांकडे मागणी असूनही उत्पादनावर मर्यादा येत आहेत. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन घटले आहे. दरवाढीबरोबरच बाजारात साठेबाजीचे प्रकारही वाढत असल्याने उद्योजकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
चौकट
रेझिनच्या दरात मोठी वाढ
रेझिनच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ
रेझिनचे भाव ८५ ते १०० रुपये प्रति किलो
पीव्हीसी पाईप उत्पादनात २० ते ३० टक्के घट
------------------------
कोट
कच्च्या मालाची कमतरता युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे पीव्हीसी पाइप निर्मितीला अडथळा येत असून कच्च्या मालाची उपलब्धता लवकर होणे आवश्यक आहे.
- श्रेयांस शहा, पीव्हीसी पाईप उद्योजक, चिंचोली औद्योगिक वसाहत, सोलापूर
-----------------------
कोट
पाइप निर्मितीसाठी लागणारे रेझिन सध्या आयात होत नसल्याने उपलब्ध होत नाही. मागणी भरपूर असूनही उत्पादन वाढवता येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
-अभिजित देशपांडे, पीव्हीसी पाईप उद्योजक, चिंचोली औद्योगिक वसाहत, सोलापूर
............