पीवायसी क्लब ः बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या पीवायसी बॅडमिंटन लीगमध्ये जोग कॉमेट्स संघाविरुद्धच्या लढतीत बेल्फिन्स टायगर्स संघाचा इशान लागू शटल परतविताना शेजारी प्रीती सप्रे.
----------
बेल्फिन्स टायगर्स, नाडगोंडे रेव्हन्स संघांची आगेकूच कायम
पीवायसी बॅडमिंटन लीग ः सेइनुमेरो रॉकेट्स आणी हॉक्स संघांचे विजय
पुणे, ता. ९ ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन लीगमध्ये नाडगोंडे रेव्हन्स आणि बेल्फिन्स टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवीत आपली आगेकूच कायम राखली आहे. अन्य लढतींत सेइनुमेरो रॉकेट्स आणि हॉक्स या संघांनी विजय मिळविले.
पीवायसी क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या वरिष्ठ विभागाच्या ‘ब’ गटात मिहिर विंझे, तन्मय चोभे, इशान लागू, प्रीती सप्रे, कर्णा मेहता, यश मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, तनिश बेलगलकर, निखिल चितळे, नेहा लागूच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर बेल्फिन्स टायगर्स संघाने जोग कॉमेट्स संघाचा ५-२ असा सहज पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. या वेळी पराभूत संघाच्या नितीन कोनकर, अनिल आगाशे, विवेक लिमये व संदीप साठेची खेळी अपुरी पडली.
अनिश राणे, कृष्णनील गोरे, अभिजित खानविलकर, अनुज मेहता, आनंद शहा, सिद्धांत खिंवसरा, जनक वाकणकर, राधिका इंगळहळीकरच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर हॉक्स संघाने रंगतदार सामन्यात कारा इंटलेक्ट कियाज संघाचा ४-३ असा पराभव केला. यावेळी पराभूत संघाच्या
सिद्धार्थ निवसरकर, बिपिन देव, बिपिन चोभे, गौतम लोणकर, नकुल बेलवलकर व प्रिशा पटवर्धनने केलेली खेळी अपुरी ठरली.
‘अ’ विभागात प्रतीक धर्माधिकारी, केदार नाडगोंडे, समीर सावला, विश्वास मोकाशी, आशय कश्यप, चिन्मय चिरपुटकर, अविनाश दोशी, पृथ्वी शहा, रिआन करंदीकर, सारा नवरे यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर नाडगोंडे रेव्हन्स संघाने वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाचा ५-२ असा पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह आपली आगेकूच कायम ठेवली. या वेळी पराभूत संघाकडून देवेंद्र चितळे, अक्षय ओक, मकरंद चितळे व अनिल देडगेची खेळी अपुरी ठरली.
सेइनुमेरो रॉकेट्स संघाने इम्पिरिअल स्वान्स संघावर ५-२ असा विजय मिळविला. यावेळी सेइनुमेरो रॉकेट्स संघाकडून अनिकेत सहस्रबुद्धे, वरुण साहू, दीप्ती सरदेसाई, समीर जालान, नीलाश केळकर, हेमंत पाळंदे, क्षितिज कोतवाल, वेदांत खटोड, संस्कृती जोशी, सोहम जोशी यांनी अफलातून खेळी केली. पराभूत संघाच्या देवेंद्र राठी, सुदर्शन बिहाणी, निखिल भाटे व रोहन पैची खेळी एकाकी ठरली.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.