पुणे : लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका पुणे शहरातील सात ते आठ हजार पिग्मी एजंट यांना बसला आहे. जवळपास दीड महिन्यांपासून त्यांचे कलेक्शन बंद असल्याने त्यांना मिळणारे कमिशन बुडत आहे. त्यातून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर तरी हे सुरळीत सुरू राहणार का असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. त्यामुळे बॅंकांनी पुढाकार घेऊन अशा पिग्मी एजंटांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
नागरी सहकारी बॅंका, पतपेढ्या, क्रेडिट सोसायट्यांसाठी दररोज कलेक्शन करणारे पिग्मी एजंटची संख्या पुणे शहरात मोठी आहे. दररोज दुकानदार अथवा छोट्या व्यावसायिकांना हे एजंट घरपोच सेवा देतात. दररोज कलेक्शन करून हे बॅंकेत जमा करतात. त्यातून दर महिन्याला त्यांना एकूण जमा होणाऱ्या रकमेवर अडीच ते तीन टक्के कमिशन मिळते. अशा प्रकारे आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्यांची संख्या पुणे शहरात जवळपास सात ते आठ हजाराहून अधिक आहे. तर जिल्ह्यातील या संख्या यापेक्षा पाच पट आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 24 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. संचारबंदी असल्यामुळे या एजंट लोकांना कलेक्शन करणे देखील अवघड झाले आहे. महिनाभर कलेक्शन झाल्यानंतर त्यांना बॅंकेकडून कमिशन दिले जाते. परिणामी गेल्या दीड महिन्यांपासून कलेक्शन बंद असल्यामुळे त्यांचे कमिशन बुडत आहे. त्यातून अनेकांचे हाल सुरू झाले आहे. लॉकडाऊन कधी उठणार. उठल्यानंतर नेहमीचे ग्राहक हे कलेक्शन सुरू ठेवणार का, असे अनेक प्रश्न त्यांच्या पुढे उभे राहिले आहेत.
ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास
गेल्या 27 वर्षांहून अधिक काळ मी पिग्मी एजंट म्हणून काम करतो. त्यातून मला दर महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमिशन मिळते. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे कलेक्शन बंद आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आमच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देणार का.
- हनुमंत हस्पे (पिग्मी एजंट)
पेट्रोलपंप चालक अडचणीत! मुख्यमंत्र्याकडे केली 'ही' मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.