पुणे

शिक्षण, लग्नासाठी पैसे आणणार कोठून?

सकाळवृत्तसेवा

पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे खातेदार-ठेवीदारांना केवळ एक हजार रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. कोणाला मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, कोणाच्या घरी लग्न समारंभ आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्‍न या खातेदार आणि ठेवीदारांना पडला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. याबाबतची सूचना रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी (ता. ६) जारी केली. त्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांनी या बॅंकेच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. त्यांच्या एक हजार रुपयांपासून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बॅंकेत अडकल्या आहेत; परंतु त्यांना एक हजार रुपयांची स्लिप भरण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे ठेवीदार सभासद हवालदिल झाले आहेत. 

खडकी येथील सायकल विक्रेते चरणजीतसिंग वालिया म्हणाले, ‘मी आणि माझा भाऊ दररोज या बॅंकेत पिग्मी एजंटद्वारे पैसे भरत होतो. बॅंक अडचणीत असल्याचे कोणीही सांगितले नाही. सुमारे चार लाखांच्या ठेवी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले होते. तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी शुल्क भरायचे आहे; पण आता मी काय करू?’ 

उषा लसनपुरे यांच्या ठेवी असून, केवळ एक हजार रुपये मिळणार असल्याचे त्यांना बॅंकेतून सांगण्यात आले. पाटील इस्टेटमध्ये नुकत्याच लागलेल्या आगीत त्यांचे घर भस्मसात झाले. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. आकुर्डी येथील एका दिव्यांग व्यक्‍तीने शेतजमीन विक्री करून तीन लाख रुपये बॅंकेत ठेवले आहेत. त्या रकमेच्या व्याजावर घरखर्च सुरू होता; पण आता पैसे मिळत नसल्यामुळे संसार कसा चालवायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT