पुणे

पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन

CD

रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन

जिल्ह्यात १५ हजार बियाणे मिनीकिट १० नोव्हेंबरपूर्वी वितरित करणार

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उपअभियानांतर्गत रब्बी ज्वारी २०२६-२७ या योजनेतून पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे, म्हणजेच ६३४ क्विंटल बियाण्यांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणारे पीक म्हणून रब्बी ज्वारीला महत्त्व आहे. पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे उपलब्ध होणार असून, प्रतिकूल परिस्थितीतही पीक उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच चारा उपलब्धतेचा प्रश्न सोडविण्यासही हातभार लागणार आहे.

एका मिनीकिटमध्ये चार किलो बियाणे
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एका मिनीकिटमध्ये चार किलो ज्वारीचे बियाणे देण्यात येणार आहे. यामध्ये परभणी सुपरमोती, फुले यशोमती आणि पीकेव्ही शक्ती या सुधारित वाणांचा समावेश आहे. त्यासोबत पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त जैविक खत आणि ज्वारीच्या योग्य लागवडीसाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

महाडीबीटीवर ऑनलाइन नोंदणी आवश्यक
या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे मिनीकिटचे वितरण करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

सुधारित बियाण्यांचा वापर करावा
रब्बी ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास कमी पाण्यात अन्नधान्य उत्पादनासह पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन सुधारित बियाण्यांचा वापर करावा आणि वेळेत पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Fire : पुण्यात स्वारगेटजवळ धावत्या शिवाई बसला भीषण आग, १७ प्रवासी थोडक्यात बचावले

Pune Crime News: पैसे स्वीकारून घटस्फोट नाकारणाऱ्या पत्नीला दणका; न्यायालयाकडून पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर

Maharashtra Live News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन

DEEPTI SHARMA: शतक ठोकलं अन् इतिहास रचला! दीप्ती शर्माची अशी कामगिरी, थेट सचिन तेंडुलकरांच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री

नोव्हेंबरमध्ये ४ राशींचं नशीब चमकणार! गुरु, मंगळ अन् केतूच्या युतीने होणार धनलाभ?

SCROLL FOR NEXT