---- पान ६ नांदेड ----
परभणी जिल्ह्यात रब्बी
पिकविमा योजना लागू
ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुगाचा समावेश
ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान रब्बी पीकविमा योजना २०२६-२७ लाग करण्यात आली आहे. या योजनेत ज्वारी, गहू, हरभरा, तसेच उन्हाळी भुईमूग पिकांचा समावेश असून, ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू आणि हरभरा १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
रब्बी हंगामातील पिकांचा विमा योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणे ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मात्र योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी स्वरूपात कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
--- चौकट ---
येथे करा अर्ज
शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या https://pmfby.gov.in या अधिकृत पोर्टलवर स्वतः नोंदणी करावी किंवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप तसेच सामूहिक सेवा केंद्र यांच्या माध्यमातून योजनेत सहभागी होता येते.
--- चौकट ----
अधिक माहितीसाठी संपर्काचे आवाहन
परभणी जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली असून, क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, काकडे बीझ, आयकॉन, ई-स्क्वेअरजवळ, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६, (ई-मेल pmfby2026@uiic.co.in) येथे आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पीकविमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.........चौकट ---
रब्बी पीकविमा योजना
पीक...विमा संरक्षित रक्कम...शेतकरी हिस्सा विमा...अर्जासाठी अंतिम मुदत
ज्वारी (जिरायती)...३६०००...५४० रुपये...३० नोव्हेंबर
गहू (बागायती)...४५०००...१८० रुपये...१५ डिसेंबर
हरभरा...३६०००...५४० रुपये...१५ डिसेंबर
उन्हाळी भुईमूग...४०६००...४०.६० रुपये...३१ मार्च
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.