पुणे

उंब्रज येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार

CD

पिंपळवंडी, ता. ४ : उंब्रज (ता. जुन्नर) नंबर २ येथील शेवाळपाईन परिसरात शुक्रवारी (ता. ४) सकाळी आठच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली. या कुत्र्याने एका ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेसह एका तरुणावर भीषण हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच चार गायी आणि तीन पाळीव कुत्र्यांनाही चावा घेतला. स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केल्यामुळे अनर्थ टळला.
उंब्रज येथील कुसुम शांताराम हांडे (वय ८०) या शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास आपल्या घराच्या दरवाजाजवळ बसलेल्या होत्या. त्यावेळी अचानक आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर थेट हल्ला चढवला आणि त्यांच्या जबड्याचा चावा घेतला. कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की कुसुम आजींचा जबडा फाटून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला.
कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मंचर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे (पिंपरी) येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अगोदर सकाळी सव्वा सहाच्या सुमारास शुभम जालिंदर हांडे (वय ३०, रा. उंब्रज २) हा तरुण त्याच्या मोटार सायकलवरून शेतात जात असताना मोटारसायकलच्या समोरच असलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने अचानकपणे या तरुणाच्या डाव्या पायाचा चावा घेऊन त्यालाही जखमी केले. शुभम हांडे याने पिंपळवंडी व नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले.
या हल्ल्यांसोबत पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरातील गणेश हांडे, रवींद्र दांगट आणि कैलास दांगट यांच्या चार गायींना तसेच इतर तीन पाळीव कुत्र्यांना चावा घेतला.
कुत्र्याचा वाढता उपद्रव आणि दहशत पाहून परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीने एकत्र येत या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला. त्यामुळे परिसरातील इतर नागरिक आणि लहान मुलांवरील संभाव्य धोके टळले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता. २) पिंपळवंडी येथेही एका पिसाळलेल्या कुत्र्याने नक्ष क्षीरसागर (वय ४), अब्दुल मोमीन (वय २६), इंदूबाई माळी (वय ८०) (सर्व रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) व जयराम बारेला (वय २४, रा. १४ नंबर, ता. जुन्नर) या चार जणांना चावा घेऊन जखमी केले होते. त्यांच्यावर पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
पिंपळवंडीच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे पत्र पिंपळवंडी ग्रामपंचायतीला दिले आहे. पिंपळवंडी येथील कुत्र्याचा बंदोबस्त त्याच दिवशी करण्यात आला होता. प्रशासनाने भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात डीजेबंदी होणार? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विद्यानंद बापटांच्या मराठीचं केलं कौतुक

Nepal flood: नेपाळ महापूर! नऊ दिवस फक्त 'हरे कृष्ण'चा जप अन् ऐन जन्माष्टमीच्या दिवशी बोगद्यातून जिवंत बाहेर काढलं

Maratha Reservation : २२ गावांतील मराठा बांधवांचा महामार्गावर रास्ता रोको

Marathi News Live Updates : पुण्यात डीजेविरोधात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाची हाक

Kannad News : स्वतःच्या वाहनातून शाळेत आणले, प्रोजेक्टरने शिकविले! शाळेचा बदलतोय चेहरामोहरा

SCROLL FOR NEXT