Pune Racecourse Sakal
पुणे

रेसकोर्सचे मैदान सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले

केंद्र सरकार व राज्य सरकारचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेक ठिकाणी मैदाने, जॉगिंग ट्रॅक सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकारचे (State Government) नियम (Rules) शिथिल झाल्यामुळे अनेक ठिकाणी मैदाने, जॉगिंग ट्रॅक सुरू करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत बंद असलेले रेसकोर्स मैदानही (Racecourse Ground) सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यापासून खुले (Open) होणार आहे. यामुळे येथे नियमित येणाऱ्या हजारों नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळने यासंदर्भात १२ ऑगस्टला बातमी दिली होती. त्याची दखल घेत पुणे कॅन्टोमेंट बोर्डाने रेसकोर्सच्या व्यवस्थापनास मैदान सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्यापासून पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात पर्यंत आठवड्यातील सर्व दिवस मैदान खुले राहणार आहे.

रेसकोर्सवर अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने नागरिक सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी किंवा व्यायामासाठी येतात. तसेच प्रशिक्षित व इतर खेळाडू या मैदानाचा सरावासाठी उपयोग करतात. लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊनही रेसकोर्स बंद असल्याने खेळाडू व फिटनेसप्रेमी नाराज होते. त्यांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

रेसकोर्स मध्ये दोन किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, व्यायाम, योग करण्यासाठी प्रशस्त मैदान आहे. दुसरी लाट आल्यावर सर्वसामान्य नागरिकांना रेसकोर्सवर प्रवेश बंद करण्यात होते. मैदान खुले करण्याची परवानगी मिळाल्याने सर्व फिटनेस प्रेमींची आता प्रतीक्षा संपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

SCROLL FOR NEXT