पुणे

इस्कॉन पंचम ब्रम्होत्सव

CD

PNE26W64346 -
फोटोओळ :
सोलापूर : नगरप्रदक्षिणेदरम्यान दीपदान करताना श्री राधा दामोदर भक्त.


राधा दामोदरांना एक हजार किलो फुलांचा अभिषेक
व्रजधाम इस्कॉनमध्ये २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पंचम ब्रह्मोत्सव; तीन हजार भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : एक हजार किलो फुलांचा पुष्पाभिषेक, महाभिषेक, दीपदान आणि हरिनाम संकीर्तन... अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी व्रजधाम इस्कॉन येथील श्री श्री राधा दामोदर मंदिराचा पंचम ब्रह्मोत्सव साजरा होणार आहे. मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या महोत्सवात अडीच ते तीन हजार भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
शोभायात्रेने महोत्सवाचा प्रारंभ
२१ नोव्हेंबरला सकाळी संत निवास भवनाचे उद््घाटन होईल. सायंकाळी श्री श्री राधा दामोदरांची शोभायात्रा नवी पेठेतील चौपाड विठ्ठल मंदिरापासून निघेल. नवी पेठ मार्केट, सोन्या मारुती, माणिक चौक, मधला मारुती, बाळीवेस, टेलिफोन भवन आणि चाटे गल्लीमार्गे ही शोभायात्रा शिवानुभव मंगल कार्यालयात पोहोचेल. तेथे दीपदान आणि महाप्रसाद होईल. २२ नोव्हेंबरला विविध भक्तिमय कार्यक्रम, तर २३ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस मुख्य धार्मिक सोहळा
२४ आणि २५ नोव्हेंबरला पहाटे ४.३० वाजल्यापासून मंगलारती, नरसिंह आरती, तुळशी आरती, हरिनाम जप, दर्शन आरती आणि गुरू पूजा होईल. त्यानंतर श्री श्री राधा दामोदर उत्सव विग्रहांसह श्री श्री गौर निताई आणि श्री लक्ष्मी नरसिंहदेव यांचा महाभिषेक करण्यात येईल. श्री श्री राधा दामोदरांच्या मूळ विग्रहांना एक हजार किलो फुलांनी पुष्पाभिषेक हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. यानंतर दीपदान, गोपीगीत गायन आणि महाप्रसाद होईल.

शहरात दररोज दीपदान
कार्तिक महिन्यात भगवान श्री दामोदरांना दीप अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. यानिमित्त व्रजधाम इस्कॉनतर्फे जुळे सोलापूर, जुना विडी घरकुलसह शहरातील विविध भागांत दररोज दीपदान केले जात आहे. सायंकाळी भक्त घरोघरी हरिनाम संकीर्तन करून नागरिकांना दीपदानासाठी प्रोत्साहित करतात. दीप अर्पण केल्यानंतर दामोदराष्टकाचे गायन केले जाते.
बुधवारी (ता. ४) विजयनगर, एमआयडीसी रोड परिसरात सायंकाळी पाच वाजता झालेल्या दीपदान उपक्रमात सुमारे १५०० भाविक सहभागी झाले. शहरात दररोज ३०० ते ४०० भाविक दीपदान करतात. पंचम ब्रह्मोत्सवातही सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्रजधाम इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तिरंगा फडकवणे गुन्हा मानला जाऊ नये - आशुतोष रांका

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT