पुणे

राधिका रस्‍त्‍याची पुन्‍हा दुरस्‍ती

CD

राधिका रस्‍त्‍याची पुन्‍हा दुरुस्ती

सातारा, ता. २० : येथील राधिका रस्‍त्‍याच्या डांबरीकरणात दोष आढळल्‍याने त्‍याबाबत पालिकेने संबंधित यंत्रणेस कठोर सूचना केल्‍या होत्‍या. या सूचनेनंतर त्‍या रस्‍त्‍यावरील काही भागांचे पुन्‍हा डांबरीकरण करण्‍यात येत आहे.
रहदारीने गजबजलेल्‍या रस्‍त्‍यांपैकी एक रस्‍ता म्‍हणून राधिका रस्‍त्‍याची ओळख आहे. या रस्‍त्‍यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे येथून जाताना नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. यानुसार पालिकेने गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर या रस्‍त्‍याच्‍या डागडुजीचे काम हाती घेतले होते. हे काम सतत दोन रात्री पालिकेच्‍या मार्फतीने त्रयस्‍थ यंत्रणेने केले.
या कामादरम्‍यान वापरलेले हॉटमिक्‍स विविध कारणांमुळे उखडले गेले. हॉटमिक्‍स उखडल्‍याने या रस्त्यावरून जाता पुन्‍हा एकदा वाहनांना हादरे बसण्‍यास सुरुवात झाली. याची तक्रार झाल्‍यानंतर पालिकेने या रस्‍त्‍याची पाहणी केली. पाहणीनंतर हॉटमिक्‍स उखडून पडलेल्‍या भागातील रस्‍त्‍याचे पॅचिंग पुन्‍हा करण्‍याच्‍या सूचना पालिकेने त्रयस्‍थ यंत्रणेस केल्‍या.
यानुसार हे काम पुन्‍हा एकदा हाती घेण्‍यात आले आहे. हे काम पूर्ण करण्‍यासाठी त्रयस्‍थ यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू केले असून, या कामामुळे या रस्त्यावरून ये- जा करणे वाहनधारकांसाठी सुखदायी झाले आहे.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT