पुणे

पंजाबच्या निवडणुकीपूर्वी चढ्ढांना मोठी जबाबदारी?

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.८ ः आम आदमी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार राघव चढ्ढा यांच्याकडे आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चढ्ढा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनीही अलीकडेच मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर अकाली दल पुन्हा ‘एनडीए’त परतणार काय, अशीही चर्चा सुरु आहे.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेस पक्ष त्रस्त असून विद्यमान सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी देखील फारसे अनुकूल वातावरण नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात व्यापकपणे शिरकाव करण्याच्या योजनेवर भाजप काम करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘आप’मध्ये सक्रिय असताना चढ्ढा यांच्याकडे पंजाबची जबाबदारी होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

कोब्राने फणा काढला, मुंगूस भिडला; कुणीही माघार घेईना, थरारक लढतीचा VIDEO व्हायरल

WEEKLY HOROSCOPE: नशिबाची दारं उघडणार! ‘या’ राशींना पुढील ७ दिवसांत पैसा, प्रमोशन अन् मोठी संधी

Fast food restaurant: चिकनमध्ये आढळलं कंडोम! दाम्पत्य हादरलं, हॉटेलविरोधात कोर्टात धाव

Beed News : बोगस शालार्थ आयडी घोटाळा; बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांचा जामीन अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT