Raghunath Mashelkar credits Tata scholarship  sakal
पुणे

Ratan Tata : ‘टाटांच्‍या शिष्‍यवृत्तीमुळेच शिकलो’

Scientist Raghunath Mashelkar : प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी रतन टाटा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत टाटांच्या शिष्यवृत्तीमुळेच आपले शिक्षण पूर्ण करता आले असे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘मी १९६० मध्‍ये दहावीमध्‍ये बोर्डात अकरावा आलो. त्‍यानंतर मला टाटा ट्रस्‍टकडून प्रतिमहिना ६० रुपयांची शिष्‍यवृत्ती मिळाली. त्‍या शिष्‍यवृत्तीच्‍या जोरावरच मी माझे रसायनशास्‍त्रात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करू शकलो व शास्‍त्रज्ञ होऊ शकलो.

असे अनेक माशेलकर त्‍यांनी घडवले आहेत,’’ अशी आठवण प्रसिद्ध शास्‍त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी रतन टाटा यांच्याविषयी व्‍यक्‍त केली.

माशेलकर म्हणाले की, टाटांशी त्‍यांचा जुना संबंध आहे. ते केवळ उद्योगपती म्‍हणून नव्‍हे, तर एक व्‍यक्‍ती म्‍हणूनही तितकेच श्रेष्‍ठ होते. त्‍यांच्‍यामध्‍ये विनम्रता, शालीनता, कामाच्‍या प्रती असलेली तळमळ हे गुण होते.

तसेच साधी राहणी आणि उच्‍च विचारसरणी असे त्‍यांचे तत्त्व होते. दुसरी गोष्टी म्‍हणजे टाटा आणि मला ३० मार्च २००० रोजी पद्मभूषण सन्‍मानाने तत्‍कालीन राष्‍ट्रपती के. आर. नारायणन यांच्‍याकडून गौरविले, हे विशेष. बोर्डावर संचालक म्हणून टाटा कार्यरत असताना मी पाहिले, की त्‍यांचे उद्योगात नफ्यावर विशेष लक्ष नसायचे; पण हेतू लोकांच्‍या कल्‍याणाचा असायचा.

त्‍यांच्‍या टाटातील टी म्‍हणजे ट्रस्‍ट किंवा विश्‍वास होय. त्‍यांच्‍या कारकिर्दीत ४० पटीने उत्‍पन्‍न वाढले व ५० पटीने नफाही वाढला. त्‍यांनी जागतिक स्‍तरावर ठसा उमटवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT