रहिमतपुरात तब्बल ५० वर्षांनी एकत्र
१९७५-१९७६ बॅचच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
रहिमतपूर, ता. ५ ः येथील राधाकृष्ण स्वामी विद्यालय म्हणजेच आताच्या डॉ. काकासाहेब परांजपे विद्यालयाच्या १९७५-१९७६ बॅचमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. तब्बल पन्नास वर्षांनंतर एकत्र आलेल्या जुन्या सवंगड्यांनी आठवणींना उजाळा दिला.
मुख्याध्यापक पी. पी. वावरे, उपमुख्याध्यापक टी. व्ही भोसले, अच्युत माने, एस. एन. माने यांनी स्वागत केले. पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने- कदम यांनी स्नेहमेळाव्यास शुभेच्छा दिल्या. निवृत्त मुख्याध्यापक भरत निकम यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन व डॉ. काकासाहेब परांजपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी पी. जी भोसले, शिवाजीराव भोसले, आशा भोसले, जी. डी. माने, औंधकर यांचे स्वागत केले. भीमराव पाटील, पी. जी. भोसले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी दादासाहेब भोसले, जब्बार पठाण, श्रीमंत माने, प्रल्हाद शेरकर, साबिरा मुल्ला, सुधाकर भोसले, विजया नेरकर, रवींद्र भोसले, रवींद्र माने, छाया माने, नजमा नदाफ, सुनंदा होमकर, रंजना जाधव, हणमंत कुंभार, उद्धव भोसले, भरत निकम, जयश्री औंधकर, शंकर खंडाईत, सुरेश सूर्यवंशी, विश्वनाथ निकम, कृष्णत जाधव, जयवंत माने, विजय काटे, रामचंद्र कदम, यासीन डांगे, अमिन आतार, अशोक पवार, हरिबा पवार, अंकुश मोरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. साबिरा मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब भोसले यांनी आभार मानले.
-----------------------------
01604
रहिमतपूर : स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेले राधाकृष्ण स्वामी विद्यालयाचे माजी विद्यार्थी.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.