पुणे

रहिमतपूर,नगरपालिकेचा १३४.५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

CD

रहिमतपूरचा १३४.५० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

कोणतीही करवाढ नाही; स्वच्छता, दलित वस्ती सुधारणा व रस्ते विकासाला प्राधान्य

रहिमतपूर, ता. २७ : येथील नगरपालिका सभागृहात २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा १३४ कोटी ५० लाख ९० हजार ९१६ रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा वैशाली नीलेश माने यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अखेर २५ लाख ९४ हजार ५६३ रुपयांची शिल्लक दर्शविण्यात आली आहे.
सभेस उपनगराध्यक्ष केतन माने, मुख्याधिकारी विशाल भोसले तसेच सर्व विद्यमान नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी लेखापाल दिनेश राऊत यांनी उत्पन्न व खर्चाच्या ठळक बाबी सभागृहासमोर मांडल्या. करवाढ टाळून विकासावर भर देण्यात आला.
नगराध्यक्षा माने यांनी सांगितले, की कोणतीही करवाढ न करता शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येणार आहे. स्वच्छता अभियान, घनकचरा व्यवस्थापन, दलित वस्ती सुधारणा, रस्ते विकास, शौचालय व आरोग्य सुविधा यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
नगरपालिका पाणीपुरवठा तोट्यात असल्याने सोलर सिस्टीमचा पर्याय राबविण्याची सूचना नगरसेवक नीलेश माने यांनी केली. ज्यांनी अद्याप नळ कनेक्शन घेतले नाही, त्यांना मागणीनुसार कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरासरी पाणीपट्टी आकारण्याबाबतही सूचना मांडण्यात आली.
नगरसेवक रंजीत माने यांनी सर्व लहान- मोठ्या व्यावसायिकांचा नगरपालिकेत समावेश करून खोके भाडेपट्टी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सभेअखेरीस तांत्रिक त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याचे आश्वासन देत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छ, सुबक रहिमतपूर हेच उद्दिष्ट असल्याचे नगराध्यक्षा माने यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------
महसुली, भांडवली तरतुदी

प्रारंभिक शिल्लक ः ३१ कोटी १६ लाख ५१ हजार ३५२ रुपये
एकूण महसुली जमा : १० कोटी ८३ लाख ७६ हजार ५०० रुपये
भांडवली जमा : ९२ कोटी ५० लाख ६३ हजार ०६४ रुपये
एकूण जमा (शिल्लकसह) : १३४ कोटी ५० लाख ९० हजार ९१६ रुपये
महसुली खर्च : १० कोटी ८३ लाख आठ हजार ८६५ रुपये
भांडवली खर्च : १२३ कोटी ४१ लाख ८७ हजार ४८८ रुपये
एकूण खर्च : १३४ कोटी २४ लाख ९६ हजार ३५३ रुपये
----------------------------
महत्त्वाच्या योजना, निधी तरतूद

वैशिष्ट्यपूर्ण योजनेस १५ कोटी
प्रधानमंत्री आवास योजनेस एक कोटी
अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणेस दीड कोटी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेस एक कोटी
एसटीपी प्रकल्पास अडीच कोटी
विशेष रस्ता अनुदानास पाच कोटी
खासदार स्थानिक विकास निधीस ८० लाख
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT