पुणे

रहिमतपूर नगरपालिकेस 5 कोटी

CD

रहिमतपूर नगरपालिकेस पाच कोटी

आमदार मनोज घोरपडेंच्या प्रयत्नातून निधी मंजूर

रहिमतपूर, ता. ८ ः आमदार मनोज घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून शहरातील पाच कोटींची विविध पायाभूत विकासकामे होणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार घोरपडे सातत्याने प्रयत्नशील आहेत. सरकारच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी यापूर्वीही निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात आणखी पाच कोटींची भर पडली. आमदार घोरपडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पाच कोटींचा विशेष निधी मंजूर झाला. या निधीच्या माध्यमातून पालिकेच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम व फर्निचरचे काम करण्यासाठी तीन कोटी, काशीद गल्ली येथे दत्त मंदिर परिसरात पालिकेचे सामाजिक बहुउद्देशीय सभागृह नूतनीकरण करणे ६० लाख रुपये, नदाफ दफनभूमी विकसित करण्यासाठी ५० लाख, ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी ४० लाख रुपये, नहरवाडी येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. या निधी मंजुरीमुळे शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. निधी मंजुरीबद्दल शहरवासीयांकडून आमदार घोरपडे यांच्यासह भाजप-महायुती सरकारचे आभार मानण्यात आले.


६४९९३
मनोज घोरपडे

....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT