Crime sakal
पुणे

Crime News : बारा तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघड; ४५ लाख रुपयाची रोकड केली हस्तगत

चौफुला येथे जेवणासाठी थांबले असताना घडला भयानक प्रकार.

संतोष काळे

राहू - चौफुला (ता. दौंड) येथील पुणे- सोलापूर महामार्गावरील हॉटेल रघुनंदन येथे जेवणासाठी थांबलेल्या शरद मधुकर डांगे (वय-७६ वर्ष), त्यांची सून आणि व्याही (राहणार चैतन्यवाडी, जि. बुलढाणा) या कुटुंबीयाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्यासोबत असलेल्या बंडू उर्फ गजानन काळवाघे (वय-४० वर्ष) रा. चैतन्यवाडी, जि. बुलढाणा याने जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून चारचाकी गाडीतील ४५ लाख रुपयांची बॅगेमधील रोकड (ता. २३) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हस्तगत करून चौफुला-केडगाव मार्गे शिरूरच्या दिशेने पळून गेला.

डांगे कुटुंब कर्नाटक येथून पुण्याच्या दिशेने चालले होते. दरम्यान चौफुला येथे जेवणासाठी थांबले असताना हा भयानक प्रकार घडला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि यवत पोलिसांनी नाकेबंदी करत अत्यंत शिताफीने सापळा रुचून पुणे-नगर रोडवरील पीर फाटा (न्हावरा फाटा) येथे आरोपी बंडू उर्फ गजानन काळवाघे (वय-४० वर्ष) रा. चैतन्यवाडी, जि.बुलढाणा याला ४५ लाख रुपयांच्या रोकडसह ताब्यात घेतले.

पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस कोठडी सुनावली आहे .पुढील अधिक तपासासाठी न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शरद डांगे यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली असून फिर्यादीमधील माहितीनुसार शरद डांगे यांच्या सुनबाईंच्या वडिलांची (व्याही) कर्नाटक राज्यातील इंडी गावात जमीन होती. सदर जमीन विक्रीचा व्यवहार आरोपी बंडू उर्फ गजानन काळवाघे याने मध्यस्थी करून वीरभद्र कट्टी, राहणार इंडी, राज्य कर्नाटक यांच्याशी जमवून दिला होता. एकुण १८ एकर क्षेत्राच्या व्यवहारापोटी ५० लाख रुपये ॲडव्हान्स देण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलिसांच्या धडक कारवाईमुळे आरोपीला शिताफीने पकडण्यात आले. त्यामुळेच आम्हाला आमची रक्कम परत मिळाली असे डांगे कुटुंबीयांनी सांगितले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्थानिक पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, अमित पाटील, प्रदीप चौधरी, प्रवीण संपांगे, अभिजीत पवार, तुषार पंदारे, राजू मोमीन जनार्दन शेळके, संजव जाधव आदी पोलीस पथकांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT