buffalo kal
पुणे

Buffalo : आठ पाय, दोन मुंडके अन् चार कान... दौंडमध्ये शेतकऱ्याच्या म्हशीला प्रसवला अजबच रेडा

गर्भवती म्हशीने तब्बल आठ पाय, दोन शेपूट, चार कान, दोन मुंडके, एकमेकांना धड चिकटलेल्या दोन रेडकांना जन्म दिला. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

संतोष काळे

राहू - टेळेवाडी (ता. दौंड) येथील शेतकरी आप्पासाहेब थोरात व अर्जुन थोरात यांनी पुणे येथून विकत आणली होती. आणलेल्या (गाभण) गर्भवती म्हशीने तब्बल आठ पाय, दोन शेपूट, चार कान, दोन मुंडके, एकमेकांना धड चिकटलेल्या दोन रेडकांना जन्म दिला. त्यामुळे परिसरात आश्चर्य यक्त होत आहे.

आजपर्यंत आपण चार, पाच किंवा सहा पायापर्यंतचे रेडकू जन्मलेले पाहिले असतील. टेळेवाडी येथील शेतकरी थोरात यांची म्हैस गाभण होती. आज तीला नर जातीचे दोन रेडुक धड एकमेकांना चिकटलेले आणि आठ पाय व दोन शेपूट असलेले रेडकू नवराञीच्या पूर्वसंध्येला जन्माला आले. दरम्यान डॉक्टरांपुढे म्हैस वाचवण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

मात्र निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. बबन तेजनकर, पशुधन पर्यवेक्षक डॉ. संतोष बडेकर, डॉ. शांताराम वाघमोडे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून म्हशीला वाचविण्यात यश आले. म्हशीची प्रसूती सुखरूप करण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. सुखरूप प्रसूतीनंतर चिंतेत असलेले थोरात कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

पशुधनावर माणसांसारखे प्रेम करणारे थोरात कुटुंब आहे. म्हैस सुखरूप असल्याचे पाहून घरातील थोरामोठ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. दरम्यान आठ पाय दोन शेपूट दोन धड एकमेकांना चिकटलेले रेडकू जन्माला आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमचे थोरात कुटुंबीय नेहमीच पशुधनावर जीवापाड प्रेम करतो. आमचा जुना पारंपारिक जनावरांचा व्यवसाय आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आमची म्हशी सुखरूप आहे. रेडकाचा आज उशिरा अंत झाल्याने काहीशी हळद वाटत आहे.

- आबासाहेब थोरात / अर्जुन थोरात, मालक.

ही अनुवंशिकता आणि गुणसूत्रांचा दोषांमुळे अशा प्रकारचे पारडे किंवा वासरे जन्माला येतात. लाखात एखादीच घटना अशी घडू शकते. आमच्या अतक प्रयत्नानंतर त्या म्हशीला अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमधून आम्ही सुखरूप वाचू शकलो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

- डॉ. शांताराम वाघमोडे. पशुधन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

New Year Calendar : एका वर्षांत का असतात 12 महिने? 11 किंवा 10 का नाही..'या' राजाच्या निर्णयाने बदललं जगाचं कॅलेंडर, थक्क करणारी माहिती

SCROLL FOR NEXT