death sakal
पुणे

राहू : अंगावर वीज कोसळून मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू

संतोष काळे ः सकाळ वृत्तसेवा

राहू : मेंढ्यांसाठी वाघर (जाळी) लावण्याचे काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळून राहू (ता.दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील देशमुख वस्ती / भरणे वस्ती येथे आज शुक्रवारी (ता. १ ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडून सचिन आबासाहेब क-हे (वय 18) वर्ष (मूळ राहणार राख ता. पुरंदर, जिल्हा. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळ तरुणाचे नाव आहे . या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार क-हे यांचा मेंढ्यांचा वाडा देशमुख वस्ती नजीक भरणे वस्ती येथे मुक्कामी होता.

आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीजेचा कडकडाट सुरु झाला. त्यावेळी सचिन हा आपल्या मेंढ्यांच्या मुक्कामासाठी वाघर लावण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. येथील ग्रामस्थांनी सचिन याला तातडीने राहू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता येथील डॉक्टरांनी सचिन याला मृत्यू घोषित केले. यासंदर्भात राहूचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे येथील शेतकरी अंकुशराव भरणे यांचे तत्काळ सहकार्य लाभले. यवत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लोखंडे, बीट आमलदार अजिंक्य दौंडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र धाव घेतली. मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. अधिक तपास यवत पोलीस करत आहे . क-हे कुटुंबियाला शासनाने आर्थिक मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी क-हे कुटुंबातील नातेवाईक व येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT