Rahul Gandhi esakal
पुणे

Pune News : राहुल गांधी यांच्यावर दाखल तक्रारीची सुनावणी होणार ‘एमपी एमएलए’ न्यायालयात

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता एमपी एमएलए या विशेष न्यायालयात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता एमपी एमएलए या विशेष न्यायालयात होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होर्इल.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ‘एमपी एमएलए’ हे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. गांधी यांच्या तक्रारीची सुनावणी या न्यायालयात घेण्याबाबतचा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दिला आहे. गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते.

त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिलेला आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

काय असते ‘एमपी एमएलए’ न्यायालय -

कोणत्याही जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्याविरोधात फौजदारी संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि रिट पिटीशन (क) क्र ६९९, २०१६ या अंतर्गत दाखल सर्व दावे विशेष न्यायालयात चालविले जातील, अशी अधिसूचना उच्च न्यायालयाने काढली होती. त्यानुसार या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष न्यायालयात सर्व आजी व माजी खासदार आणि आमदारांचे फौजदारी दावे चालविले जातात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या बदनामी विरोधात दाखल फौजदारी दाव्याची पुढील सुनावणी या विशेष न्यायालयात होणार आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी हे विशेष न्यायालय राहुल गांधी यांना समन्स पाठवेल व नेमलेल्या तारखेस राहुल गांधी यांना विशेष न्यायालयासमोर उपस्थित राहावे लागेल.

- ॲड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi convoy: मोदींच्या ताफ्यात फक्त २ गाड्या! इंधन बचतीसाठी PM मोदींची मोठी कृती; व्हिडिओ देशभर व्हायरल

केडीएमसीमध्ये शिंदेसेना-मनसेची जवळीक! श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांची यांची भेट; पडद्यामागे काय घडलं?

Latest Marathi News Live Update : धुळ्यात शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत सव्वाशे क्विंटल पीक जळून खाक

Pune Crime : कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खून; सुनेला अटक

CBSE HSC Exam Result : 'सीबीएसई'चा बारावीचा निकाल ३.१९ टक्क्यांनी घसरला

SCROLL FOR NEXT