सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ९ः अवमानना प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात लवकर खटला चालवावा, अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वकिलाने आज सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. त्यावर ‘सर्व प्रकरणे आमच्यासमोर समान आहेत. लवकर सुनावणी हवी असेल तर त्याबद्दल अर्ज द्या, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले.
‘‘राहुल गांधी हे काही अतिमहत्त्वाचे व्यक्ती नाहीत. त्यांच्या संदर्भातील याचिका मागील पाच महिन्यांपासून पटलावर आली नाही. यापूर्वी एकदा ही याचिका पटलावर आली होती पण त्यावेळी सुनावणी झाली नव्हती. हे चांगले संकेत नाहीत, असा युक्तिवाद वकील गौरव भाटिया यांनी केला असता न्यायालयासमोर सर्वजण समान आहेत. तुम्ही अर्ज द्या, आम्ही याचिका सुनावणीसाठी घेतो, अशी टिपणी सरन्यायाधीशांनी केली.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीचा संदर्भ देत गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सरकारवर टीका केली होती. अरुणाचलमध्ये भारतीय सैनिकांना मारहाण होत असल्याचे गांधी यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला आक्षेप घेत सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) माजी संचालक उदय श्रीवास्तव यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. गांधी यांचे वक्तव्य लष्करासाठी अपमानास्पद आणि मानहानिकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. लखनौच्या न्यायालयाने गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.