पुणे

भारत उत्तर कोरिया नव्हे - राहुल गांधींचे टिकास्त्र

CD

भारत हा उत्तर कोरिया नव्हे

राहुल गांधींचे टीकास्त्र सरकारवर टीकास्त्र
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ ः ‘‘नरेंद्र मोदीजी हा नॉर्थ कोरिया (उत्तर कोरिया) नव्हे तर भारत आहे. जेव्हा सत्ता स्वतःलाच राष्ट्र समजू लागते आणि मतभेदांना शत्रू ठरवते, तेव्हा लोकशाही मृत्युमुखी पडते’’, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.
युवक काँग्रेसच्या आंदोलनाला सरकारकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ‘एक्स’वरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘दबावाखाली असलेल्या पंतप्रधानांच्या राजवटीत शांततेत आंदोलन करणे हाच सर्वात मोठा गुन्हा ठरवला जात आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला हळूहळू अशा दिशेने ढकलले जात आहे, जिथे मतभेद व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह, तर प्रश्न विचारणे म्हणजे कटकारस्थान ठरवले जाते. कोणताही मुद्दा असला तरी, सत्तेविरुद्ध घटनात्मक विरोध दर्शवला तरी लाठीमार, गुन्हे दाखल होणे आणि कारागृह हे जवळपास ठरलेलेच असते, असा आरोप करताना राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘पेपरफुटीने त्रस्त झालेल्या तरुणांनी त्यांच्या भवितव्यासाठी आंदोलन केल्यानंतर त्यांना लाठीमाराच्या रूपात उत्तर मिळाले. महिला कुस्तीपटूंनी भाजपच्या प्रभावशाली नेत्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी मागितली तर त्यांचा आक्रोश बदनाम करण्यात आला, आंदोलन चिरडले गेले आणि त्यांना रस्त्यांवरून जबरदस्तीने हटवण्यात आले. बलात्कारपीडितेच्या समर्थनार्थ इंडिया गेटवर शांततेत निदर्शने करणाऱ्यांना व्यवस्थेसाठी गैरसोय मानून हटविण्यात आले. तर युवक काँग्रेसने देशहिताला बाधक ठरणाऱ्या अमेरिकेशी व्यापार कराराविरोधात शांततेत निदर्शने केल्यानंतर त्यांना देशविरोधी ठरवून अटक करण्यात आली.’’ सामान्य नागरिकांनी विषारी हवेमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आवाज उठवला, तेव्हा पर्यावरणाची चिंता देखील ‘राजकारण’ ठरवून दडपली गेली. हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशविरोधी ठरवण्यात आले. अश्रुधूर, रबराच्या गोळ्या, पाण्याचे फवारे आणि लाठ्या-हेच संवादाचे माध्यम बनले. पाणी, जंगल आणि जमीन या हक्कांसाठी उभे राहणाऱ्या आदिवासींकडेही संशयाने पाहिले गेले.
पंतप्रधान दबावाखाली
दबावाखालील पंतप्रधान प्रश्नांना घाबरत असतील तर हे कसले लोकशाही राज्य आहे, असा खोचक सवाल करताना राहुल गांधींनी केला. मतभेद चिरडणे हाच सरकारचा स्वभावधर्म बनत चालला असल्याची तोफही डागली. ते म्हणाले, ‘‘शांततामय आंदोलन हे गुन्हा नव्हे तर लोकशाहीचा आत्मा आहे. प्रश्न विचारणे लोकशाहीचा दुबळेपणा नव्हे तर शक्ती आहे. सरकार टीका ऐकते, उत्तर देते आणि जबाबदार राहते, तेव्हाच लोकशाही बळकट होते. नरेंद्र मोदीजी हा नॉर्थ कोरिया (उत्तर कोरिया) नव्हे तर भारत आहे. जेव्हा सत्ता स्वतःलाच राष्ट्र समजू लागते आणि मतभेदांना शत्रू ठरवते, तेव्हा लोकशाही मृत्युमुखी पडते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT