पुणे

राहुल गांधी - इंदूर

CD

प्रशासन कुंभकर्णासारखे निद्रिस्त राहिले: राहुल
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे काही जणांचे मृत्यू झाल्यावरून राज्य सरकारवर हल्ले सुरू झाले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इंदूरमध्ये पाणी नाही, तर विष वाटले गेले आणि प्रशासन कुंभकर्णासारखे निद्रिस्त राहिले, असा हल्ला चढवला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर लिहिले, की इंदूरमध्ये पाणी नव्हे तर विष वाटले गेले असून प्रशासन कुंभकर्णासारखे निद्रिस्त राहिले. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही त्यांनी नाव न घेता टीका केली. घराघरांत शोककळा पसरली आहे, गरीब असहाय आहेत आणि त्यावर भर म्हणून भाजप नेत्यांची अहंकारी विधाने आहेत. ज्यांच्या घरातील चूल विझली आहे, त्यांना दिलासा हवा होता मात्र सरकारने मात्र गर्वच वाढून ठेवला. लोकांनी वारंवार घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत तक्रारी केल्या, तरीही त्याची दखल का घेण्यात आली नाही? पेयजलात सांडपाणी कसे मिसळले? वेळेत पाणीपुरवठा का बंद करण्यात आला नाही? जबाबदार अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई कधी होणार?, अशी सवालांची फैर झाडताना राहुल गांधींनी म्हटले, की हे ‘फुकट’चे प्रश्न नसून ही जबाबदारीची मागणी आहे. स्वच्छ पेयजल ही सरकारची कृपा नव्हे तर जगण्याचा हक्क आहे आणि या हक्काच्या हत्येसाठी भाजपचे डबल इंजिन सरकार, निष्काळजी प्रशासन आणि संवेदनाहीन नेतृत्व पूर्णपणे जबाबदार आहे. मध्य प्रदेश आता ‘कुशासनाचे केंद्रबिंदू बनले असल्याची घणाघाती टीकाही राहुल गांधींनी केली. तसेच पंतप्रधान मोदींनाही त्यांनी लक्ष्य केले. राहुल गांधींनी म्हटले, की कुठे खोकल्याच्या सिरपमुळे मृत्यू, कुठे सरकारी रुग्णालयात उंदरांमुळे मुलांचा जीव जातो, आणि आता सांडपाणी मिश्रीत पाणी प्यायल्यामुळे मृत्यू. जेव्हा-जेव्हा गरीब मरतात, तेव्हा मोदीजी नेहमीप्रमाणे मौन बाळगतात. असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परवडणारी घरे, मोफत वीज, स्वस्त बस भाडे अन् महिलांसाठी मासिक भत्ता... ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मोठ्या सवलतींची घोषणा

Akola Police : अकोला पोलिसांची ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे पाऊल; AI-आधारित WhatsApp चॅटबॉट ‘अकोला कॉप कनेक्ट’चा शुभारंभ!

Latest Marathi News Live Update: राहुल नार्वेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची जोरदार टीका

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

SCROLL FOR NEXT