पुणे

राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली

CD

राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली

झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज चर्चा

उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
पाटणा/रांची, ता. १६ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लिहिलेल्या पत्रानंतर, राज्य सरकार आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार झाला आहे. आता राज्य सरकार आणि विद्यार्थी आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी (१७ ऑगस्ट) स्टेट गेस्ट हाऊसमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या पुतळ्यांचे दहन केले होते. तसेच, २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता.
भरती परीक्षांमधील गैरप्रकारांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांकडून २३ दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्यात आणि सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात यावेत, या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. तसेच, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस विद्यार्थ्यांशी राजकारण खेळत असल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्येच सर्व चर्चा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. ‘सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षा हा व्यवसाय झाल्याचे सिद्ध झाले आहे. सर्व यंत्रणाच पैसे घेऊन प्रश्नपत्रिकांचा व्यापार करत आहे. त्यामुळे आयोगाकडून घेण्यात आलेल्या भरतीसंबंधी सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्यात,’ अशी मागणी प्रेमकुमार या विद्यार्थी नेत्याने केली आहे. प्रेमकुमारनेच या प्रकरणात न्यायालयात याचिका केली आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि विद्यार्थी संघटनांमध्ये एकमत होत नसल्यामुळे चर्चेची कोंडी झाली होती. मात्र, काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी हेमंत सोरेन यांना पत्र लिहिल्यानंतर ही कोंडी दूर झाली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करावा आणि त्यावर तोडगा काढावा, असे आवाहन राहुल गांधी यांनी या पत्रात केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाऐवजी सरकारने जास्त पुढाकार घेऊन विचार केला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

‘तपास संस्थांमध्ये अनेक तथ्य समोर’
भरती परीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्वग्रहदूषित नाहीत. आतापर्यंतच्या तपासामध्ये या प्रकरणाचे नेपाळशी असणारे नाते, अभय तिवारी प्रकरण आणि अन्य तथ्य समोर आले आहेत. तसेच, तपास संस्थांनी अन्यही गोष्टी समोर आणल्या आहेत. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला चुकीचे म्हणता येणार नाही, असे विद्यार्थी नेता राजेश याने म्हटले आहे. कोणतेच वास्तव समोर आले नसते, तर परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांच्या मागणीवर प्रश्न उपस्थित झाले असते. आता अनेक तथ्य समोर आले असताना, सरकारने विद्यार्थ्यांच्या हितामध्ये निर्णय घ्यायला हवेत, असेही त्याने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT