पुणे

विखे बातमी

CD

राहुल गांधींकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम

राधाकृष्ण विखे पाटील ः प्रतिमा खराब झाल्याने विद्यार्थ्यांचा वापर

अहिल्यानगर, ता.२२ ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम हाती घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत सलग तीन वेळा पराभव झाल्याने आणि जनतेतील प्रतिमा खराब झाली असल्याने या आंदोलनाचा उपयोग करून घेत असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शहरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पुण्यात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम होत आहे. याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की राहुल यांच्याकडून विद्यार्थी आंदोलनाआड राजकारण केले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांना ते काय आहेत, हे माहिती आहे. त्यामुळे त्यांचे कोणीही ऐकायला तयार नाही. सततच्या पराभवामुळे विद्यार्थी आंदोलनाचा ते उपयोग करून घेत आहेत. आताच यांना अशा गोष्टी का सुचतात. त्याबरोबरच पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलवण्यात आल्याची जी चर्चा सुरू आहे, ती फार गंभीर आहे.

...
नीट परीक्षा राज्य सरकारनेच घ्याव्यात

नीट परीक्षेच्या गोंधळाबाबत विखे पाटील यांना विचारणा केली असता या परीक्षेबद्दल जे प्रश्न निर्माण होत आहेत, त्याबद्दल मी स्वतः केंद्र शासनाकडे वेगळा प्रस्ताव देणार आहे. अशा परीक्षा या राज्य सरकारनेच घ्याव्यात, अशी मागणी मी करणार आहे.
---

पत्रकार थोरात यांची भेट

पत्रकार सुशील थोरात यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला करून त्यांना मारहाण केली होती. पालकमंत्री विखे यांनी आज थोरात यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पाइपलाइन रोडवर अवैध धंदे चालतात, पोलिसांना त्यावर अंकुश ठेवता आलेला नाही. पत्रकार हे समाज जागृतीचे काम करतात; परंतु त्यांच्यावरच असे भ्याड हल्ले होत असतील, तर ते चुकीचे आहे. पत्रकार थोरात यांना मारहाण करणारे आरोपी स्थानिक आहेत, आतापर्यंत त्यांना अटक व्हायला हवी होती. उलट, आरोपींना फरार होण्यात पोलिसांनीच मदत केली की काय, अशी शंका आहे. संबंधित आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई होणे आवश्‍यक असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

Velhe News : राजगड तालुक्यात भोंदू बाबांचा सुळसुळाट! भोंदूबाबा, जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्यास थेट कारवाई, वेल्हे पोलिसांचा कडक इशारा

Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT