पुणे

पुण्यात शनिवारी ‘छात्रों की गुंज’ अभियान ‘सावित्रीच्या लेकीं’शी राहुल गांधी साधणार थेट संवाद !

CD

पुणे, ता. १९ ः पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, वाढता शैक्षणिक खर्च, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी अशा विविध प्रश्‍नांसंदर्भात कॉंग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ‘सावित्रींच्या लेकीं’शी संवाद साधणार आहेत. देशपातळीवरील ‘छात्रों की गुंज’ हे अभियान गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २२) पुण्यात होणार आहे. त्यामध्ये हजारो विद्यार्थिनी, तरुणींचा सहभाग घेणार असून, राहुल गांधी थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी बुधवारी दिली.
पाटील यांनी बुधवारी ‘सकाळ’ कार्यालयास भेट देत पुण्यातील अभियानाची माहिती देत संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘एआयएसएसपीएमस’च्या मैदानावर होणाऱ्या अभियानात हजारो विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. शहरातील महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व समाजमाध्यमांद्वारे विद्यार्थिनींना या अभियानाशी जोडले आहे. तसेच विविध संस्था, संघटनांद्वारे देखील विद्यार्थिनी सहभागी होतील.’’
-----------
नोंदणीत पुणे देशात अव्वल
युवक कॉंग्रेसकडून देशातील २८ शहरांमध्ये ‘छात्रों की गूंज’ अभियान राबविले जात आहे. राजस्थानमधील कोटा तेथून गांधी यांनी संवाद साधण्यास सुरुवात केली. पुण्यातून २ लाख २६ हजार २१२ इतक्‍या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सूचना नोंदणी केली आहे. देशात सर्वाधिक सूचना पुण्यातून नोंदविल्या आहेत.
-़़------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT