पुणे

कार्यकर्त्यांनी शंभर मुलींची नोंदणी करावी ः सपकाळ राहुल गांधींच्या उपस्थितीत शनिवारी ‘छात्रों की गुंज’

CD

पुणे, ता. १७ : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत २२ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यांनी ही ऐतिहासिक मोहीम हाती घेतली असून, या कार्यक्रमात अधिकाधिक विद्यार्थिनी सहभागी होण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील पाच दिवसांत किमान १०० मुलींचे नोंदणीकरण करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी काँग्रेस भवनमध्ये झाली. या बैठकीत सपकाळ बोलत होते. माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार विश्वजित कदम, राहुल गांधी यांचे सहकारी मनोज त्यागी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, रमेश बागवे, प्रवक्ते हनुमंत पवार, शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अध्यक्ष सौरभ अमराळे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वसुधा निरभवने, सुरेखा परिहार, अनिता खरात, कल्पना पडळकर, सुनीता हजारे, ऋषिकेश चव्हाण, ऋषी ओव्हाळ आणि सनी परमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे आणि अधिकाधिक युवतींना कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.
विश्वजित कदम म्हणाले, ‘‘पुणे हे विद्येचे माहेरघर आणि क्रांतिकारी शहर आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत काँग्रेसचा कार्यकर्ता आढळतो.’’
उपाध्यक्ष ॲड. नीलेश बोराटे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT