इंदूर,ता.१९ (पीटीआय) ः ‘‘ एका व्यवस्थेने सगळा देश ताब्यात घेतला असून त्या व्यवस्थेलाच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारू नये असे वाटते,’’ अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज येथे ‘छात्रों गूंज’ या कार्यक्रमामध्ये बोलताना केले. ‘‘विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांना वगळून तो सामर्थ्यशाली बनू शकत नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.
राहुल म्हणाले, की देशामध्ये शिक्षकाच्या दहा लाख जागा रिक्त आहेत. एक लाख शाळा बंद झाल्याअसून त्यांतील ५५ टक्के या उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील आहेत. सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवाल हे सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवत असून त्यात समाजमाध्यमांचा देखील समावेश आहे. अनेकांवर पाळत ठेवण्याचे कामही ते करत आहेत. विद्यार्थी याच व्यवस्थेला अदानी, अंबानी, जय शहा आणि अन्य मंडळींबाबत प्रश्न विचारतात पण अंधभक्त हे त्यांना विरोध करतात. मध्यप्रदेशातील विविध परीक्षांमध्ये तेरा टक्क्यांचा कोटा राखून ठेवण्यात आला होता पण आता तो देखील गोठविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद
- राहुल यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. देवासमधील एका विद्यार्थ्याने आम्ही परीक्षा व्यवस्थेमधील त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतर याच व्यवस्थेने आमच्याविरोधात एफआयआर दाखल करत आम्हाला तुरुंगामध्ये टाकल्याचा दावा केला.
राहुल म्हणाले
- व्यवस्थेला विद्यार्थी नाही अंधभक्त हवेत
- अंधभक्त हे कधीच प्रश्न विचारत नाहीत
- विद्यार्थ्यांशिवाय देश मजबूत होत नाही
- शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार
- सध्या देशातील विद्यार्थ्यांवर दबाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.