पुणे

Rahul Gandhi: सावरकरांवर बोलण राहूल गांधींना भोवणार? चार ऑक्टोबरला मांडावे लागणार म्हणणे

Latest Pune Court news : या प्रकरणावर सोमवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१९) न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला होता. मात्र या प्रकरणावर सोमवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरीत न्यायालयाने हा आदेश ३० मे ला दिला होता.

या प्रकरणात राहुल गांधी यांना समन्स बजावण्याची पूर्तता झाली असल्यास त्याचा अहवाल न्यायालयात येतो. त्यानंतरही राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत, तर अटकेचे वॉरंट काढले जाते. परंतु, समन्स बजावण्याची पूर्तता झाली नसेल, तर प्रतीक्षा करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT