पुणे

राहुल गांधी - प्राथमिक बातमी

CD

मुलींनो, चौकट तोडा

पुण्यातील ‘छात्रों की गूँज’मध्ये राहुल गांधी यांचे आवाहन

पुणे, ता. २२ (पीटीआय) : ‘‘महिला स्वतःच्या मालकीच्या आहेत, त्या त्यांच्या वडिलांच्या, पतीच्या किंवा मुलांच्या मालकीच्या नाहीत. महिलेने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुष नातेवाइकांच्या अधीन राहावे, असा मनुस्मृतीतील उल्लेख लज्जास्पद आहे,’’ असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केले.
पुण्यातील ‘एआयएसएसएमएस’ महाविद्यालयाच्या मैदानावर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘छात्रों की गूँज’ या युवासंपर्क कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही तरुणींना व्यासपीठावर बोलवून त्यांचे अनुभवही ऐकून घेतले. या कार्यक्रमात त्यांनी महिला विद्यार्थिनींशी शिक्षणाची उपलब्धता, आर्थिक स्वावलंबन, सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षा, हिंसाचार आणि सायबर छळ अशा विविध विषयांवर थेट संवाद साधला. तसेच, ‘पिंजरा तोडा’ असे आवाहन करत गांधी यांनी प्रत्येक व्यक्ती वेगळी असून तिची स्वतःची स्वप्ने आणि दृष्टिकोन असल्याचे सांगितले.
भारतातील ७० कोटी महिला या त्यांच्या वेगवेगळ्या जीवनयात्रा, कल्पना आणि स्वप्नांमुळे देशाची सर्वांत मोठी ताकद आहेत. महिला या देशाची सर्वांत मोठी संपत्ती असून, महिलांनी स्वतःसाठी उभे राहावे आणि स्वतःवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, “मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, बालपणी स्त्रीने वडिलांच्या अधीन राहावे, तारुण्यात ती पतीच्या अधीन असते आणि पतीच्या मृत्यूनंतर ती मुलांच्या अधीन असते. स्त्रीने कधीही स्वतंत्र असता कामा नये. हे शब्द लज्जास्पद आहेत. हे शब्द उच्चारलेही जायला नको होते. तुम्ही कोणाच्याही मालकीच्या नाही, तुम्ही केवळ स्वतःच्या मालकीच्या आहात. तुमचे वडील, भाऊ, पती किंवा मुलगा यांच्याशी तुमचे नाते आहे; मात्र तुम्ही त्यांच्या मालकीच्या नाही, तुम्ही स्वतःच्या मालकीच्या आहात.” मी येथे व्याख्यान देण्यासाठी किंवा राजकारणावर चर्चा करण्यासाठी आलेलो नाही, तर तरुणांना त्यांना काय वाटते हे व्यक्त करण्याची आणि त्यांच्या कल्पनांवर चर्चा करण्याची संधी देण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

राहुल म्हणाले...
- तुम्ही वेगळे आहात, तुम्ही विशेष आहात, तुम्ही स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुमचे स्वतःचे स्वप्न व दृष्टिकोन आहे.
- माझे तर्क असे आहे की, महिला स्वभावतः पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील, अधिक सौम्य, अधिक करुणाशील आणि भविष्याकडे पाहणाऱ्या असतात.
- महिलांना अनेकदा मुलगी, पत्नी किंवा आई या तीनच ओळखींमध्ये सीमित केले जाते. या नात्यांमध्ये काहीही चुकीचे नाही; मात्र हीच त्यांची एकमेव ओळख असू शकत नाही.
- महिला व्यावसायिक आणि क्रीडापटू बनतात तसेच विविध क्षेत्रांत सक्रिय असतात. मात्र, त्यांच्या ओळखी अनेकदा पुरुषांशी असलेल्या नात्यांच्या माध्यमातूनच निश्चित केल्या जातात.

‘मी तुमच्यासोबत येऊन बसेन’
आदिवासी समाजातील एका तरुणीने वसतिगृहातील सुविधा, शिक्षण आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्न मांडल्यानंतर “मला तिथे बोलवा, मी तुमच्यासोबत येऊन बसेन,” असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. आदिवासी विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या १० दिवसांपासून पुण्यातील मांजरी येथे उपोषण करत आहेत. दोन तरुणीही या आंदोलनात सहभागी असून, त्यापैकी एका तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे या तरुणीने सांगितले. आदिवासी आश्रमशाळांच्या स्थितीबाबतही तिने चिंता व्यक्त केली. अनेक संस्थांमध्ये खाटा आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप तिने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत मोठी बातमी; फडणवीसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

Leopard Attack : सहजपूरला बिबट्याच्या हल्ल्यात १७ बोकड ठार; ईदसाठी बोकड आणले होते

Shirur Crime : जास्त व चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून परप्रांतिय तरूणीवर सामुहीक अत्याचार; सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Balewadi Accident : चिखलामुळे बालेवाडीत दुचाकीस्वारांचे अपघात; नागरिकांचा संताप

Rahul Gandhi: महिलांची ओळख वडील, पती किंवा मुलांमुळे नाही... ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींनी मांडली महिलांच्या स्वातंत्र्याची भूमिका

SCROLL FOR NEXT