mpsc darshana pawar death  Sakal
पुणे

Darshana Pawar: दर्शना पवार मृत्यूच गूढ उकलले; आरोपी राहुल हांडोरेला मुंबईतून अटक; हत्येचं कारण...

धनश्री ओतारी

दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे.(Rahul Handore arrested in Darshana Pawar murder case)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.(Latest Marathi News)

दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा राहुलची होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. (Latest Marathi News)

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.

राहुल हांडोरे नेमका कुठं होता?

वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. (Latest Marathi News)

पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT