पुणे

राहुरीत भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये घबराट

CD

राहुरीत भूकंपाचा सौम्य धक्का

राहुरी, ता. ९ ः राहुरी शहरासह तालुक्यातील काही भागात शनिवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. नाशिकच्या उत्तर-वायव्य दिशेला सुमारे ४९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे.

रात्री अचानक घरांना हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी घरांवरील पत्रे थरथरली, तर मांडणीवरील भांडी खाली पडल्याचे नागरिकांनी सांगितले. घरातील वस्तूंना किरकोळ हादरे बसल्याने अनेकांना भूकंपाची तीव्रता स्पष्टपणे जाणवली. धक्का जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. नागरिकांनी शेजारी व नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांच्या परिसरातही हादरा जाणवला का, याची माहिती घेतली. रात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला नेमके काय घडले, याबाबत काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. त्यानंतर भूकंपाचा धक्का असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू झाली.

ग्रामीण भागातील काही नागरिकांनी भूकंपाच्या आधी किंवा त्याचवेळी पाळीव प्राण्यांमध्ये अस्वस्थता जाणवल्याचे सांगितले. काही ठिकाणी जनावरे अचानक उठल्याचे, तसेच पाखरांचा किलबिलाट वाढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT