RHF26B11362
राहुरी : शहरातील मानाचा गणपती आझाद मंडळ ट्रस्टच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करताना माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पोपळघट व ज्योती पोपळघट.
राहुरीत ढोल-ताशांचा गजरात आगमन
राहुरी, ता. १५ : शहरासह तालुक्यात ‘गणपती’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत गणरायांचे उत्साहात आगमन झाले. घरोघरी, सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विधीवत प्राणप्रतिष्ठा करून गणरायांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी (ता. १४) मंगलमय वातावरणात घराघरांत आणि सार्वजनिक गणेश मंडळांत मंगलमूर्ती गणराय विराजमान झाले. शहरातील अनेक मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन व प्राणप्रतिष्ठा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
शहरातील मानाचा गणपती आझाद तरुण मंडळ, श्रीराम दत्त मित्र मंडळ, शिवाजी चौक मित्र मंडळ, बुवासिद्ध बाबा मित्र मंडळ, श्रीदत्त गणेश मित्र मंडळ, मळगंगा तरुण मंडळ, श्रीराम तरुण मंडळ, व्यंकटेश तरुण मंडळ, ज्ञानेश्वर मित्र मंडळ, गजानन तरुण मंडळ, केशर मित्र मंडळ, सातपीर बाबा मित्र मंडळ, वाल्मीक तरुण मंडळ, महावीर गणेश मंडळ यांसह लहान-मोठ्या मंडळांनी उत्साहात गणरायांची स्थापना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.