पुणे

राहुरी पोलीस ठाण्यासमोर हाणामारी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

हाणामारी प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
राहुरी, ता. १८ : राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटांत पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जबाजी धोंडीराम बाचकर, सयाजी पोपट बाचकर, जबाजी सखाराम बाचकर, ज्योती जबाजी बाचकर व अर्चना अनिल बाचकर (सर्व रा. गणपतवाडी, मानोरी) अशी आरोपींची नावे आहेत. मानोरी येथील गणपतवाडी परिसरात दोन गटांत वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही गट गुरुवारी (ता. १४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास तक्रार देण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिस ठाण्याच्या गेटसमोर दोन्ही गटांत शाब्दिक वाद होऊन धक्काबुक्की झाली. त्यानंतर महिला व पुरुषांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड व गोंधळ पाहून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन हाणामारी सोडविली. याप्रकरणी पोलिस नाईक संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘सर असं करतील वाटलं नव्हतं.’ मोटेगावकरांच्या अटकेनंतर पोस्ट व्हायरल; पत्र्याचं शेड ते क्लासेसचं मार्केट, कसा झाला शिक्षणाचा बाजार?

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

RBI Job: RBI मध्ये सुरुवातीलाच 1.5 लाख पगाराची संधी! अर्ज करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Mumbai Local: लोकलमधील सीटचा वाद विकोपाला! आधी शाब्दिक वाद, नंतर मारहाण अन् थेट प्रवाशावर हल्ला

Latur Crime : उदगीरमध्ये २४ किलो ७४० ग्रॅम गांजा जप्त; ७.४२ लाखांचा साठा

SCROLL FOR NEXT