पुणे

चिंचोली येथे एका वाळू तस्कराला अटक, एक डंपर व एक ट्रॅक्टर जप्त

CD

प्रवरा नदीपात्रात वाळूतस्कराला अटक
राहुरी पोलिसांची कारवाई ः डंपरसह ट्रॅक्टर जप्त
राहुरी, ता. ९ : चिंचोली येथे शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता पोलिसांच्या पथकाने प्रवरा नदीपात्रात‌ छापा टाकून एका वाळूतस्कराला ताब्यात घेतले. एक जण फरार झाला. पोलिसांनी वाळूचोरीच्या कामातील एक डंपर व एक ट्रॅक्टर असा २३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सुनील रमेश डेमरे (रा. आढाव वस्ती, खडकी रोड, ता. कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक गडाख, (रा. पारेगाव, ता. संगमनेर) असे फरार आरोपीचे नाव आहे.
चिंचोली येथे प्रवरा नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे, अशी गोपनीय खबर पोलिसांना मिळाली. शुक्रवारी रात्री बारा वाजता सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक आशिष चौधरी, संजय विखे, हवालदार शिवाजी नन्हे, देविदास कोकाटे यांच्या पथकाने चिंचोली येथे प्रवरा नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी काही इसम वाळूचोरी करताना आढळले. पोलिस पथकाने एक डंपर व एक ट्रॅक्टर जप्त केला. यावेळी एक जेसीबी चालक त्याच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेला. ट्रॅक्टरवरील चालक देखील पसार झाला. एका वाळूतस्कराला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
पोलिस हवालदार देविदास कोकाटे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये वाळूचोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT