slaughterhouse sakal
पुणे

कोंढव्यातील साखळी कत्तलखान्यावर छापा; १४ गाई व ६ टन गोमांस जप्त

मीठानगर भागात गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीसांनी कारवाई करत साखळी कत्तलखान्यावर छापा टाकला.

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा - मीठानगर भागात गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीसांनी कारवाई करत साखळी कत्तलखान्यावर छापा टाकला आहे. यामध्ये १४ गाई आणि ६ टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. छापा टाकताच आरोपी फरार झाले.

ही माहिती शादाब मुलाणी, निखील दरेकर, सचिन शिंत्रे यांच्या फोन कॉलवरून मिळाल्यानंतर पोलिसांनी मिठानगरमधील गल्ली क्रमाकं २४मधील अनधिकृत शेडवर छापा टाकला. यामध्ये पोलिसांना कापलेल्या अवस्थेतील गोमांस मोठ्या प्रमाणावर आढळून आले. तसेच कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या १४ गाई व गोवंश सापडले.

संबंधित गोतस्करांवर कारवाई करून याबाबत कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नट्टु वसीम कुरेशी (वय ३५) पप्पु लक्ष्मण भिसे (वय ४५), मलंग कुरेशी (वय ४५) इक्बाल कुरेशी (वय ३५) फैजाज कुरेशी (वय ३२) असिफ कुरेशी (वय ३५) यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोमांस डिस्पोज केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरिक्षक हर्षदा दगडे या करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT