पुणे

मनमोहक फुलांच्या गालिच्यांचा रायरेश्वर पठारावर बहर

CD

हिर्डोशी, ता. ३ : भोरपासून २८ किलोमीटर अंतरावरील किल्ले रायरेश्वर (ता. भोर) येथील पठार हिरव्यागार वेलींनी तसेच दुर्मीळ कोमल, विविधरंगी फुलांच्या गालिच्याने फुलू लागले आहे. मनमोहक फुलांनी बहरत असलेले पठारावरील अद्‌भुत निसर्गसौंदर्य पर्यटकांना साद घालत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्वरवरील पठार म्हणजे जणू काही निसर्गसौंदर्याचा ठेवाच आहे. बारा किलोमीटर लांब आणि अडीच किलोमीटर रुंद असलेल्या या पठारावरील परिसरात सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत निळ्या, पिवळ्या, गुलाबी, पांढऱ्या अशा विविध रंगी फुलांचा बहार सुरू होत असतो.

रायरेश्वर पठारावरील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळाबरोबरच निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. तसेच रायरेश्वर पठारावर जाताना आंबवडे येथील प्राचीन नागेश्वर मंदिर, झुलता पूल आणि धबधबे, केंजळगड, डोंगररांगावरील हिरवळीने नटलेले निसर्गाचे सौंदर्य न्याहाळत व आनंद घेता येतो. पर्यटकांची शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी रायरेश्वरावर मांदियाळी दिसून येते.

वनदेवतेने अंथरलेला अनोखा गालिचा
रंगीबेरंगी फुलांच्या छटा वाऱ्याच्या झोकात विविध रंगांची उधळण होत असल्याचे पर्यटकांना पहावयास मिळते. वनदेवतेने अंथरलेला अनोखा गालिचा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांना ही रंगीबेरंगी फुले नेहमीच खुणवतात. दरवर्षी येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. अद्‌भुत निसर्गसौंदर्याचे चित्रीकरण व छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घेण्याचा आनंद पर्यटक घेत असतात.


ही खुनावतायेत रानफुले
सोनकी, चवर, तेरडा
रान हळद, पांढरा कुडा
पांढरा साप कांदा, पान तेरडा
बेशरम, दीपकांती, बेवडी, बुई


पठारावरील पर्यटकांसाठी पर्वणी
लहान तलाव, शिव मंदिर
छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा
सात रंगांची माती, पांडवकालीन लेणी
जलकुंड यासह पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणारे धबधबे
धुके आणि हिरवेगार निसर्गसौंदर्य

सुविधा
- अभिषेकासाठी पुजारी उपलब्ध
- पायथ्यावर वाहनतळ
- स्थानिकांकडून फराळ, चहा, जेवण व राहण्याची सोय

पठारावर जाण्याचा मार्ग
- भोरपासून साधारण २८ तर पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतर
- भोरहून आंबवडे, कोर्ले मार्गे पायथ्यापर्यंत वाहनाने आणि तेथून लोखंडी शिडीने पठारावर पायी जाता येते

पर्यटकांना आवाहन
- शिडीचा काळजीपूर्वक वापर करावा, शिडीवर गर्दी करू नये
- धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा
- धोकादायक धबधबे, पाण्याच्या प्रवाहात उतरू नका
- पठारावरील डोंगराच्या कडेला जाऊ नये


आपत्कालीन मदतीसाठी संपर्क
- भोर पोलिस ठाणे (०२११३) - २२२५३३
- रुग्णवाहिका ९०४९३०१६१९ (आंबवडे आरोग्य केंद्र)
- स्थानिक बचाव पथक- ९२७२७१८००८ (सह्याद्री रेस्कू टीम)

03850, 03851, 03848

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Vidyanand Bapat Santosh Chavan : संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांना का मारलं ? खरं कारण सांगितलं; मंडळाचा माजी अध्यक्ष काय म्हणाला?

Krishna Janmashtami 2026 Do's & Don'ts: गोकुळाष्टमीचा उपवास करताना 'या' गोष्टी टाळाच; श्रीकृष्णांची राहील सदैव कृपा!

अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती, गोव्यात खासगी कंपनीत करतायत काम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या 15 मागण्या काय? सरकारची भूमिका काय? | Maratha Reservation

SCROLL FOR NEXT