मुलीवर अत्याचार sakal
पुणे

नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

अल्पवीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रेल्वे स्टेशनवर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट: पुणे रेल्वे स्थानक परिसरात मागिल आठवड्यामध्ये अल्पवयीन मुलीवर आठ नराधमांनी अत्याचार केल्याच्या घटनेने पुण्याची प्रतिमा मलीन झाली आहे. रेल्वे प्रशासनाने महिला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात. माणुसकीला काळीमा फासणारी घटना भविष्यात होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी व्यक्त केले.

भाजपचे आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (मंगळवार, दि. ७) पुणे रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकातील सुरक्षेसंबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यात आले.

डीआरए युसीसी मेंबर आणि अल्पसंख्यांक मोर्चा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सलीम शेख यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महिला अध्यक्ष मीनाज शेख, अमरीन शेख, उपाध्यक्ष भाजप अल्पसंख्यांक मोर्चा पुणे शहर, सरचिटणीस फातिमा शेख, उपाध्यक्ष मैमुना शेख, महिला आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष जाकीर शेख, चिटणीस अहमद शेख, सिद्धू गोसावी, गणेश यादव, माजी अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

अन्वर पठाण म्हणाले की, सांस्कृतिक पुण्यामध्ये महिलांवरील अत्याच्याराच्या घटना अशा घडू लागल्यामुळे पुणे आहे की बिहार आहे, असा प्रश्न सामान्यांना सतावू लागला आहे. रेल्वे पोलीस यंत्रणेने नारी सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, असे रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फटाके फोडल्याने आजार दूर होतात, भाजप आमदाराचं अजब व्यक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?

IND vs NZ 3rd ODI : मोहम्मद सिराज, कुलदीप यादव IN? तिसऱ्या वन डेत भारताच्या Playing XI मध्ये होणार का बदल? गौतम गंभीरचे डावपेच

या बाथरूममध्ये अंघोळीला कधी येऊ? सिद्धार्थ मितालीच्या नव्या घराला पाहून लोकप्रिय अभिनेत्याची भन्नाट कमेंट; रिप्लाय देत म्हणाला-

Mumbai Local: फटाक्यांचा मुंबई लोकलला फटका, पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणेत बिघाड; सकाळ-सकाळ मुंबईकरांचे हाल

Maharashtra Live News : गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचं सांगत 18 कोटींचा गंडा

SCROLL FOR NEXT