railway-flight 
पुणे

रेल्वे, विमान वाहतूक पुण्यातून सुरू राहणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात दोन दिवसांनंतर सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या काळात शहरातून होणारी विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत राहणार आहे. तसेच, लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना रिक्षा सेवाही उपलब्ध राहणार आहे. 

कोरोनाच्या रुग्णांचा उद्रेक झाल्याने पुणे जिल्हा प्रशासनाने १४ ते २३ जुलै दरम्यान पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउन घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळ प्रशासनाकडे चौकशी केली असता, पुण्यातून दिल्ली, कोलकता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, प्रयागराज आदी आठ शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली आहे. पुण्यातील लॉकडाउन हा लोकल स्वरूपाचा निर्णय आहे. त्यामुळे विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. दरम्यान, पुण्यातील लॉकडाउनचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क मनोज झंवर  यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळावर जाण्यासाठी शहरातून ९८५९१९८५९१ या क्रमांकावर रिक्षा मिळेल. तसेच तेथे कॅब आणि प्री-पेड रिक्षालाही परवानगी दिल्याची माहिती वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिली. रेल्वे स्थानकावरूनही याच क्रमांकावरून प्रवाशांना रिक्षा मिळणार आहे. रिक्षाचालकाला मीटरवर १०० रुपये झाले असतील तर, २०० रुपये द्यावे लागतील.

Edited by : Kalyan Bhalerao

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Koli : ठाकरे गटाला मोठा धक्का! शरद कोळी 1 वर्षासाठी येरवाड्यात; नेमकं प्रकरण काय?

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात; खासदारांचा विरोध, पोलिसांच्या बससमोर ठिय्या

Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

SCROLL FOR NEXT