central railway  sakal
पुणे

Railway Cancelled : मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रविवारी राहणार बंद, पाहा वेळापत्रक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाहून सुटणाऱ्या तब्बल १२ रेल्वे गाड्या रविवारी (20 ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि लोणावळ्याहून पुण्याकडे येणाऱ्या अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

TimeTable

या लोकल रद्द
- पुणे-तळेगाव : सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी
- पुणे-तळेगाव : सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांनी
- पुणे-लोणावळा : सकाळी ६ वाजून ३० मिनिटांची, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी, दुपारी तीन वाजता, दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी.

- शिवाजीनगर-तळेगाव : दुपारी ३ वाजून ४७ मिनिटे,सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे.
- शिवाजीनगर-लोणावळा ः सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी.
- लोणावळा-शिवाजीनगर : सकाळी ६ वाजून ३० मिनिटे, सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी, दुपारी ३ वाजून ३० मिनिटे.
- तळेगावहून सुटणारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटे, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी, लोणावळाहून सकाळी ७ वाजून २५ मिनिटे, सकाळी ८ वाजून २० मिनिटे, दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हे लक्षात ठेवा
-
पुणे-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणे सहा वाजता सुटेल.
- दौंड-इंदूर एक्स्प्रेस दौंडहून सायंकाळी सहा वाजता सुटेल.
- मुंबई-चेन्नई, लोकमान्य तिलक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद या गाड्यांना पुणे विभागातून धावताना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

दरम्यान, पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानक दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. यात पुणे-कोल्हापूर डेमू एक्स्प्रेस पुणेऐवजी सातारा येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. त्यामुळे परतीच्या प्रवासात ती गाडी कोल्हापूर ते सातारा अशी धावेल. सातारा ते पुणे अशी धावणार नाही. शनिवार (ता. १९) चंडीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड-कुर्डुवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने धावेल. रविवारी सकाळी १०. ५५ ते दुपारी १.५५ या दरम्यान हडपसर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेले आहे.

असा आहे बदल
पुणे-दौंड डेमू, दौड-पुणे डेमू या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-हबीबगंज ही रेल्वे पुणे स्थानकावरून दुपारी पाच वाजता सुटेल, हैदराबाद-हडपसर ही गाडी दौड स्थानकापर्यंतच धावेल, चेन्नई-कुर्ला ही रेल्वे दौंड, मनमाड मार्गे धावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

Ashti Accident: वर्ध्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना; वाहत्या कॅनलमध्ये पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Navratri Day 4: कूष्मांडा देवी

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटली; १३ जणांचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

Navratri Upvas Recipe: उपवासासाठी बनवा खमंग गुजराती हांडवो; बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT