freight train sakal
पुणे

Railway : रेल्वेचा भोंगळ कारभार प्रवाशांच्या उठला जीवावर! ड्युटी संपली चालक घरी, मालगाडी फलाटावर तर प्रवाशी वा-यावर

रेल्वेच्या पुणे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून फलाटावर यावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

केडगाव/यवत - रेल्वेच्या पुणे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून फलाटावर यावे लागले. यवत रेल्वे स्टेशनवर दोन्ही फलाटावर मालगाड्या असल्याने पुणे बारामती डेमू गाडी मेन लाईनला घ्यावी लागली. यामुळे वृद्ध, महिला, लहान मुले यांनी मालगाड्यांच्या कफलिंगवरून फलाटावर यावे लागले. ही घटना आज रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दोषी असणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

आज सोमवार असल्याने पुणे - बारामती डेमू रेल्वेला मोठी गर्दी होती. ही गाडी पुणे रेल्वेस्थानकावरून पावणेसात वाजता सुटली. यवत येथे दोन फलाट आहेत. या दोन्ही फलाटावर मालगाड्या होत्या. यवत येथे दादर आहे. मात्र दादरपर्यंत प्रवाशांना मालगाडीमुळे पोहचता आले नाही. मालगाड्या लांबलचक असल्याने अनेकांनी कफलिंगवर चढून फलाटावर जाण्याचा धोका पत्करला.

काही प्रवाशी अंधारात पुर्ण मालगाडीला वळसा घालून स्टेशनवर आले. यात महिला, मुले, वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल झाले. प्रवाशांच्या सुदैवाने या दरम्यान कोणतीही मालगाडी चालू झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

याबाबत रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे म्हणाले, 'रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. रेल्वे कर्मचा-यांनी अत्यंत बेजबाबदार वर्तन केले आहे. दौंड बारामती दरम्यान पॅसेंजर गाड्या कमी असल्याने अशा गाड्यांना नेहमी गर्दी असते. रेल्वेने चौकशी करून यातील दोषींवर कडक कारवाई करावी.'

देशपांडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. विभागीय रेल्वे प्रबंधक यांनी बाबत दिलगीरी व्यक्त केली असून असा प्रकार पुन्हा होणार नाही. संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल. असे देशपांडे यांना तक्रारीच्या लेखी उत्तरात कळविले आहे.

'पुणे - बारामती डेमू रेल्वेने आम्ही अनेकजण यवत-पुणे रोज प्रवास करतो. आज पुण्याहून यवत येथे आलेली आमची गाडी फलाटावर न थांबवता मुख्य मार्गिकेवरच थांबवली. त्यामुळे पायऱ्या नसलेल्या डेमूच्या बोगीतून उतरणे आणि दोन्ही बाजूंच्या फलाटालगत असलेल्य मालगाड्या ओलांडून फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना खुपच कसरत करावी लागली. आम्ही २०-२५ पासधारकांनी लेखी तक्रार यवतच्या स्टेशन मास्तरांकडे केली. तेव्हा मालगाडीचा चालक ड्युटी टाइम संपला असे म्हणून गाडी सोडून गेला' असे त्यांनी सांगितले.

- सजल जैन, (पासधारक प्रवाशी) यवत (ता. दौंड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT