पुणे

पुणे : 'साहेबांना भेटायचंय, अँटिजेन टेस्ट करा!'

४०-५० रेल्वे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी चाचणी करून घेतली साहेबांची भेट!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रेल्वेचे मोठे साहेब येणार, कर्मचाऱ्यांना भेटणार म्हणून पुणे रेल्वे स्थानकांवर मोठी तयारी करण्यात आली आहे. पण, साहेबांना ज्यांना भेटायचं आहे, अशा ४०-५० जणांना अँटिजेन चाचणी करावी लागली. अन् त्यानंतरच साहेबांनी त्यांना भेट दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक किती सतर्कता बाळगत आहे, हे या घटनेतून दिसून आलं. मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सी. आलोक कन्सल हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या भेटीचा कार्यक्रम पुणे रेल्वे प्रशासनाने तयार केला. परंतु, महाव्यवस्थापक कार्यालयाकडून एक सूचना आली. ज्यांना साहेबांना भेटायचं आहे, त्या सगळ्यांची अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असेल. चाचणी केलेली नसेल तर, साहेब त्या व्यक्तीला साहेब भेटणार नाही, असं बजावण्यात आलं. ज्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत, त्यांना चाचणीतून वगळण्यात आले. पण, डोस झाल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगण्यास सांगण्यात आलं. पल्स ऑक्झिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर यांचीही पुरेशी तजवीज करण्याचीही सूचना आली.

कन्सल साहेबांबरोबर येणारे अधिकारी, सोबत असणारे कर्मचारी, त्यांना भेटणारे चार रेल्वे संघटनांचे आठ प्रतिनिधी, स्थानकावरील अधिकारी आदींना अँटिजेन चाचणी करून अहवाल सोबत ठेवावा लागला. साहेब शनिवारी सकाळी लोणावळ्याला आले. तिथून इन्स्पेक्शन ट्रेनने स्थानकांचे निरीक्षण करत पुण्यात आले. घोरपडीला लोकोशेडला त्यांनी भेट दिली. नंतर डिआरएम ऑफिसमध्ये पोचले. उपस्थित अधिकाऱ्यांची चर्चा केली. या वेळी प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून रेल्वे प्रवासी ग्रूपच्या हर्षा शहा यांना भेटण्यासाठी साहेबांनी वेळी दिली. त्यावेळी शहा यांनी, ‘पुणे- मुंबई, सोलापूर, कोल्हापूर दरम्यानच्या इंटरसिटी रेल्वेगाड्या सुरू करा, लोणावळा लोकल प्रवाशांसाठी खुली करा, पुणे- मुंबई मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करा,’ आदी मागण्या केल्या. त्यावर विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन साहेबांनी दिले आणि पुण्यातून चारच्या सुमारास ते रवाना झाले. या बाबत पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सर्वांना ॲटिजेन चाचण्या करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी चाचण्या केल्या. नेहमीच्या पद्धतीने त्यांनी रेल्वेच्या प्रकल्प, उपक्रमांची माहिती घेतली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात तब्बल 'इतक्या' रूपयांची वाढ, चांदी मात्र ५००० रुपयांनी घसरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

बापरे श्रद्धा कपूरला काय झालं! ‘ईठा’च्या चित्रीकरणात दुखापत; लावणी सीक्वेन्सदरम्यान पायाला फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update: : पुण्यात वाघोली- लोहगाव रोडवर कारला भीषण आग

Pune News : ऊसाच्या वजन चोरीवर साखर आयुक्तांचा कडक पवित्रा! 'भरारी पथके' कार्यान्वित, वजनकाटा तपासणीत आयटी तज्ज्ञ होणार सहभागी

Pune Accident: मी पोलिसाचा मुलगा, पार्टी करून आलेल्या तरुणांचा नारायण पेठेत धिंगाणा, अपंग व्यक्तीला धडक! रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT