railway news Marathi  esakal
पुणे

Railway: मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दोन दिवस अनेक रेल्वे गाड्या रद्द!

सकाळ डिजिटल टीम

Railway: मध्य रेल्वेच्या लोणावळा-पुणे विभागात खडकी-शिवाजीनगरदरम्यान विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार दोन दिवस मुंबई ते पुणेदरम्यान नियमितपणे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोणावळा येथील खडकी-शिवाजीनगरदरम्यान २२ नोव्हेंबर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग काम, मिलिटरी यार्डचे इंटरलॉकिंग आणि ऑटोमॅटिक सिग्नलिंग काम करण्यात येणार आहे.

या कामामुळे मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या गाड्या रद्द केल्या आहेत; तर काही गाड्या वेगळ्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

२५ नोव्हेंबर २०२३ रोजी ट्रेन क्रमांक १२१२३ सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द असणार आहे. २६ डिसेंबर २०२३ रोजी सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रद्द असणार आहे.

या गाड्यांना विलंब
शनिवारी काही गाड्यांना विलंब होणार आहे. ट्रेन क्रमांक ११३०२ बेंगळूरु -सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस सोलापूर विभागात २ तास ४० मिनिटे उशिराने नियमित केली जाईल. ट्रेन क्रमांक १६५०६ बेंगळूरु-गांधीधाम एक्स्प्रेस पुणे-सातारा विभागात एक तासानंतर नियमित केली जाईल. रविवारी ट्रेन क्रमांक २२१५९ सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस मुंबई विभागात अडीच तासांनंतर नियमित केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT