crime sakal
पुणे

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील तरुणी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात

अमरावतीमधील एक तरुणी बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी तेथील पोलिस ठाण्यात दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमरावती येथून अपहरण केलेल्या व धमकावून आंतरधर्मीय विवाह करण्याचा आरोप करण्यात आलेल्या तरुणीस पुणे लोहमार्ग पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानकातुन ताब्यात घेतले. खासदार नवनीत राणा यांनी संबंधित आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन अमरावतीधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, पोलिसांनी संबंधित तरुणीस ताब्यात घेतले.

अमरावतीमधील एक तरुणी बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी तेथील पोलिस ठाण्यात दिली होती. तरुणीचे अपहरण करुन तिला धमकावुन आंतरधर्मीय विवाह करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित तरुणी पुणे परिसरात असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्‍लेषणामध्ये मिळाली होती. अमरावती पोलिसांनी तरुणीचे छायाचित्र पुणे लोहमार्ग पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, तरुणी "निजामुद्दीन ते वास्को- गोवा' या रेल्वे गाडीने गोव्याकडे जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती.

बुधवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे गाडी सातारा रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेगाडी थांबवून लोहमार्ग तरुणीला ताब्यात घेतले. तरुणी एकटी प्रवास करत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबंधित तरुणीला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी गुरुवारी साताऱ्यामध्ये दाखल झालेल्या अमरावती पोलिसांच्या ताब्यात तरुणीला दिले.

'अमरावतीमधील तरुणीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर गुरुवारी साताऱ्यामध्ये दाखल झालेल्या अमरावती पोलिसांच्या पथकाच्या तायात तरुणीला देण्यात आले आहे.'

- सदानंद वायसे-पाटील, पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT