Rain Forecast Sakal
पुणे

Rain Forecast : नगर, नाशिकला गारपिटीचा इशारा; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी कायम

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची हजेरी कायम असल्याने राज्यातील कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. राज्यात गुरुवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह पावसाचा; तर अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून कमाल तापमानात काही ठिकाणी सरासरी इतके नोंदले गेले.

दक्षिण श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

दक्षिण कर्नाटकपासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे आगमनास पोषक हवामान होत असल्याने रविवारपर्यंत (ता. १९) अंदमान बेट समूहावर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यातही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गुरुवारी (ता. १६) पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने आला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट

  • उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

  • वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) : अहमदनगर, नाशिक.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT