Rain
Rain 
पुणे

जूनमध्ये पावसाची दडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तुम्हाला जाणवतंय ना पुण्यात यंदा अद्यापही पावसाला सुरवात झाली नाही! तुमचं हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. कारण, गेल्या चार वर्षांतील १ ते १५ जूनदरम्यानच्या सर्वांत कमी पावसाची नोंद या वर्षी शहरात झालीय! 

अर्धा जून उलटल्यानंतरही आपण अनुभवलेल्या, ‘टिपिकल’ अशा आपल्या पुण्याच्या पावसाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघतोय. पण, मॉन्सून अजूनही दक्षिण कर्नाटकमध्ये अडकलाय. अरबी समुद्रात घोंघावलेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने त्याच्या प्रवासात अडथळे आणले. पण, त्याच वेळी आपल्याकडे वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह दुपारनंतर बरसणाऱ्या पूर्वमोसमी पावसानेही यंदा दडी मारली.

त्यामुळे मेच्या मध्यानंतर जूनच्या सुरवातीपर्यंत बरसणाऱ्या पूर्वमोसमी पावसाच्या जेमतेम सरींनी शहर आणि परिसरात हजेरी लावली. त्यामुळे १ ते १५ जून यादरम्यान या वर्षी ४१.५ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याच्या शिवाजीनगर येथील केंद्रावर झाली.

पुण्यात २०१५ मध्ये १ ते १५ जूनदरम्यान १६०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एवढ्या पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये जूनच्या पहिल्या पंधरवड्यात जेमतेम २२.६ मिलिमीटर पाऊस पडला होता. हा गेल्या दहा वर्षांमधील सर्वांत कमी पडलेला पाऊस आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT