rain  sakal
पुणे

पुणे शहरात गुरुवारपर्यंत पावसाचा मुक्काम

बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी पुण्यासह राज्यात मॉन्सून अजूनही सक्रिय आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी पुण्यासह राज्यात मॉन्सून अजूनही सक्रिय आहे.

पुणे - बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी पुण्यासह राज्यात मॉन्सून अजूनही सक्रिय आहे. आजही शहर व परिसरात सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. गुरुवार (ता.१५) पर्यंत पुण्यासह राज्यभरात आकाश प्रामुख्याने ढगाळ आणि दुपारनंतर एक-दोन जोरदार सरींची हवामान खात्याने वर्तविली आहे.

कोकण किनाऱ्यावरील चक्राकार वारे, अरबी समुद्रातून येणारी बाष्पयुक्त ढग आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळं राज्यात मॉन्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिवसभर आकाश प्रामुख्याने ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहे.

पुणे व परिसरात मंगळवारी सकाळापासूनच हलक्या सरींना सुरवात झाली होती, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटणे किंवा उन्मळून पडणे, रस्ते निसरडे होणे, रस्त्यावर खड्डे पडणे आणि सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस कोकण, घाटमाथा आणि दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम रूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही अंशी पावसाची तीव्रता कमी होईल असे संकेत आहे. याच काळात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे.

पुणे शहरातील पाऊस (रात्री ९ पर्यंत, मिमी)

  • शिवाजीनगर : ३.१

  • लोहगाव : २.६

  • चिंचवड : १२.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT