monsoon sakal
पुणे

Pune Rain : पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल अडखळली असली तरी राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल अडखळली असली तरी राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्गसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत बुधवारी (ता. १९) जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या चोवीस तासांमध्ये हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. नाशिकमधील हर्सूल येथे ७७ आणि रत्नागिरीतील खेड येथे ७१ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही.

उन्हाचा चटका वाढला

पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार गेला. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४१.३ अंश तापमानाची नोंदले गेले. चंद्रपूर येथे पारा ४० अंशांपार गेला.

कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर बुधवारी (ता. १८) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या जिल्ह्यात यलो अलर्ट

  • ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा

  • वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

  • बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT